खडसेंच्या प्रवेशानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्रात, तारीख आणि स्थळ ठरलं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.(Sharad Pawar To Visit Dhule And Nandurbar)

खडसेंच्या प्रवेशानंतर शरद पवार प्रथमच उत्तर महाराष्ट्रात, तारीख आणि स्थळ ठरलं!
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 12:13 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शरद पवार पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्रात जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या ठिकाणी जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. (Sharad Pawar To Visit Dhule And Nandurbar)

शरद पवार येत्या 20 आणि 21 नोव्हेंबरला धुळ्यासह नंदूरबारला जाणार आहेत. यावेळी ते त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधणार आहेत. शरद पवारांच्या दौऱ्यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाकडून जय्यत तयारी केली जात आहे. राष्ट्रवादीच्या विस्तारासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.

विशेष म्हणजे खडसेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून पहिलाच जाहीर दौरा केला जाणार आहे. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीसह खडसे समर्थकांकडून जोरदार शक्तप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या या दौऱ्यासाठी खास नियोजनही केले जात आहे. त्यांचा हा दौरा नेमका कसा असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून ग्रँड एव्हेंट केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अनेक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरु झाल्याचे बोलले जात आहे. (Sharad Pawar To Visit Dhule And Nandurbar)

संबंधित बातम्या : 

फाशी घेण्याची वेळ आली होती, इतकं भाजपातील एका व्यक्तीने छळलं : एकनाथ खडसे

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन जळगावात आज काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने! जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.