West Bengal Election Results: पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी एकहाती भाजपला धूळ चारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली | Sharad Pawar West Bengal Election Results

West Bengal Election Results: पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत
ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 1:52 PM

मुंबई: पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांनी एकहाती भाजपला धूळ चारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात, असे शरद पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. (NCP chief Sharad Pawar on West Bengal Election 2021)

संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. सध्याच्या आकेडवारीनुसार, तृणमूल काँग्रेस 204 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 86 जागांवर आघाडीवर आहे.

West Bengal Election Results 2021 LIVE: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींपुढे मोदी-शाहांचा करिष्मा फेल, तृणमूल काँग्रेसला 203 जागांवर आघाडी

आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.

आजारपणामुळे शरद पवार ममतादीदींच्या प्रचाराल गेले नाहीत

शरद पवार हे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ममता बॅनर्जी यांचा प्रचार करणार होते. ग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार यांना पत्र लिहून बंगालमध्ये प्रचाराला येऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, ही विनंती डावलून शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या मदतीला जाण्याचे ठरवले होते.

मात्र, अचानक शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे शरद पवार यांचा पश्चिम बंगाल दौरा रद्द करण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

लाश वही है, बस कफन बदल गया है, बंगालच्या निकालावर गुलाबराव पाटलांचं भाष्य

West Bengal Election Results 2021: बंगालमध्ये भाजपला झटका म्हणजे ‘मिशन महाराष्ट्र’ बारगळणार?; वाचा सविस्तर

(NCP chief Sharad Pawar on West Bengal Election 2021)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.