BIG BREAKING | शरद पवार एकही वज्रमूठ सभेला हजर राहणार नाहीत, पडद्यामागे घडामोडी काय?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीच्या येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी होणाऱ्या वज्रमूठ सभेला संबोधित करणार असल्याची माहिती समोर आलेली. पण त्यानंतर आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

BIG BREAKING | शरद पवार एकही वज्रमूठ सभेला हजर राहणार नाहीत, पडद्यामागे घडामोडी काय?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 4:50 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याची चाहूल लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) नुकतंच पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडी 2024च्या निवडणुका एकत्र लढेल हे आताच कसं सांगू? असं म्हणाले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याचा वेगळा किंवा चुकीचा अर्थ काढू नका, असंही स्पष्टीकरण दिलं आहे. असं असताना आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

राज्यात आणि देशात आगामी निवडणुकांमध्ये भाजपला घेरायचं असेल किंवा भाजपचा पराभव करायचा असेल तर सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येणं जरुरीचं असल्याचं मत अनेकांकडून व्यक्त केलं जात आहे. याच विचारातून देशभरातील विरोधक एकवटत आहेत. महाराष्ट्रात तर 2019 च्या निवडणुकीनंतरच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीची स्थापना झाली. या महाविकास आघाडीची राज्यात अडीच वर्षे सत्ताही राहिली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याने हे सरकार कोसळलं.

मविआची 1 मे महाराष्ट्र दिनी मुंबईत मोठी सभा

राज्यात सध्या एकनाथ शिंदे आणि भाजप नेते उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार आहे. राज्यात लवकरच महापालिका निवडणुकाही जाहीर होतील. तसेच त्यानंतर पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे. त्यानंतर विधानसभेची देखील निवडणूक असणार आहे. या आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीची राज्यभरात सभा घेण्यात येत आहे. यापैकी पहिली सभा ही संभाजीनगर येथे झाली. त्यानंतर दुसरी सभा नागपुरात झाली. आता तिसरी सभा ही येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे.

सूत्रांकडून महत्त्वाची बातमी

भाजपला सभेच्या माध्यमांमधून घेरण्यासाठी महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांकडून प्रयत्न केले जात आहे. महाविकास आघाडीच्या याआधीच्या दोन सभांना नागरीक आणि कार्यकर्त्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या मुंबईतील सभेकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. कारण या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: हजर राहून भाषण करणार असल्याची माहिती समोर आली होती. पण आता सूत्रांकडून वेगळीच माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार हे महाविकास आघाडीच्या आगामी मुंबईतील वज्रमूठ सभेत हजर राहणार नाहीत. विशेष म्हणजे फक्त मुंबईच नाही तर राज्यात होणाऱ्या मविआच्या इतर कोणत्याही वज्रमूठ सभेमध्ये शरद पवार हजर राहणार नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत तीनही पक्षांचे दोन-दोन नेते संबोधित करणार आहेत. वज्रमूठ सभा ही राज्यातील नेत्यांची सभा आहे. शरद पवार हे राष्ट्रीय नेते असल्याने ते या सभेत हजर राहणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.