मुंबई: राष्ट्रवादी काँगेसचे बडे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत छगन भुजबळ रविवारी पक्षाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या विवाह सोहळ्यात उपस्थित राहिले होते. त्यामुळे शरद पवार क्वारंटाईन होणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. (NCP Chief Sharad Pawar will quarantine after Chhagan Bhujbal tested corona positive)
राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा रविवारी ( 21 फेब्रुवारी) नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार दिलीप बनकर तसंच राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी लग्नसोहळ्याला उपस्थित होते. लग्न सोहळा पार पडून आणखी 24 तासही उलटत नाहीत, तोपर्यंतच भुजबळ यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शरद पवार क्वारंटाईन होणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता शरद पवार यांनी 1 मार्च पर्यंत आपले सगळे सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत, अशी माहिती आहे.
रायगडमधील रोहा येथील कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी राज्यात कोरोना प्रचंड वेगाने फोफावतोय, असं म्हटलं होते. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. मात्र, तरीदेखील नागरिकांमध्ये गांभीर्य नसल्याने शरद पवार यांनी नाराजी आणि संताप व्यक्त केला होता. राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर आहेत. प्रत्येकाने खबरदारी घेण्याची जास्त आवश्यकता आहे. कोरोना विषाणू घातक आहे, त्यामुळे काळजी घ्या, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.
“मी आता येताना आदिती आणि तटकरे साहेबांना दाखवतो होतो, रस्त्याने दहा माणसं दिसली त्यापैकी सात माणसांच्या तोंडावर मास नव्हतं. सगळे लोकं मला हात दाखवत होते. नमस्कार करत होते. मी म्हटलं मास्कचं काय? तर त्यावर कुणी बोलत नव्हतं”, असं शरद पवार म्हणाले
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन भुजबळ यांनी केली. तसंच माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असंही ते म्हणाले आहेत.
कोरोनाची लागण झालेले ठाकरे सरकारमधील मंत्री
कॅबिनेट मंत्री
राज्यमंत्री
मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरीhttps://t.co/Sk31IH69Ns@ChhaganCBhujbal @PawarSpeaks @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2021
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय, दोन आठवड्यांसाठी जनता दरबार स्थगित
ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह
मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी
(NCP Chief Sharad Pawar will quarantine after Chhagan Bhujbal tested corona positive)