सारिका सोनवणेंवर हल्ला झाला नाही, खोट्या बातम्या पसरवू नये : बीड प्रशासन

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचार सभेनंतर त्यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. पण या या वृत्ताचं बीड पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खंडन करण्यात आलंय. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून तो उमेदवारांशी संबंधित नाही, असंही पोलिसांनी म्हटलंय. तर दुसरीकडे बीडमध्ये भाजपकडून गुंडगिरी केली […]

सारिका सोनवणेंवर हल्ला झाला नाही, खोट्या बातम्या पसरवू नये : बीड प्रशासन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचार सभेनंतर त्यांच्या पत्नी सारिका सोनवणे यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला, असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलाय. पण या या वृत्ताचं बीड पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून खंडन करण्यात आलंय. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली असून तो उमेदवारांशी संबंधित नाही, असंही पोलिसांनी म्हटलंय. तर दुसरीकडे बीडमध्ये भाजपकडून गुंडगिरी केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी केलाय.

धारुर तालुक्यातील धर्माळा येथे प्रचार सभेनंतर झालेल्या घटनेच्या अनुषंगाने अफवा खोटी बातमी आणि क्लिप्स समाज माध्यमांद्वारे प्रसारित केल्या जात आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये दोषी आढळल्यास कायद्यानुसार कडक कारवाईची तरतूद आहे. या पार्श्वभूमीवर समाज स्वास्थ बिघडविणाऱ्या अफवा अथवा खोट्या बातम्या पसरवू नयेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय आणि जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केलं.

बीड लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरेशी काळजी घेतली जात असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. शिवाय आदर्श आचारसंहितेचे पालन होऊन निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यात येईल, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

धर्माळा येथील घटनेतील दोषी व्यक्तीवर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली. राजकीय पक्षांच्या उमेदवाराशी या घटनेचा संबंध आढळून आलेला नाही. यामुळे निवडणुकीच्या काळात समाज माध्यमांवर पोस्ट प्रसारित करताना अथवा फॉरवर्ड करताना सावधानता बाळगावी, तसेच चुकीच्या खोट्या बातम्या व्हायरल होत असल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणावे. यासाठी 7030008100 हा हेल्पलाईन क्रमांक पोलीस विभागातर्फे सुरू करण्यात आलेला आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीकडून हल्ल्याचा आरोप

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बीडमधील घटनेनंतर मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. बीडमध्ये भाजपची दहशत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. बीडमध्ये भाजप गुंडगिरी करत आहे, यंत्रणांवर दबाव टाकताना दिसत आहे. अर्ज भरताना दादा मुंडे यांना मारहाण केली गेली. पोलीस कामात अडथळा आणला गेला. आता थेट उमेदवाराच्या कुटुंबाला मारहाण होताना दिसत आहे. बीडचे पोलीस भाजपचे कार्यकर्ते झालेत असा प्रश्न निर्माण होतोय. महिला उमेदवार असूनही महिलेवर हल्ला होतोय, असे गंभीर आरोप त्यांनी प्रशासन आणि भाजपवर केले.

'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.