Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार अहमदाबादमध्ये अमित शाहांना भेटले का, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

26 मार्चला अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर ही भेट झाल्याची माहिती एका गुजराती दैनिकाने दिली आहे. | Sharad Pawar Amit Shah

शरद पवार अहमदाबादमध्ये अमित शाहांना भेटले का, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार आणि अमित शाह
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 1:40 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 26 मार्चला अहमदाबादमधील एका फार्म हाऊसवर ही भेट झाल्याची माहिती एका गुजराती दैनिकाने दिली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. (NCP leader Nawab Malik on Sharad Pawar meeting with Amit Shah in ahmedabad)

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.

नेमकं काय घडलं?

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्ब यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्यानंतर भाजप-राष्ट्रवादीत अहमदाबादमध्ये गुप्त चर्चा झाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याचं खळबळजनक वृत्त समोर आलं आहे.

पवारही अहमदाबादेत असल्याची चर्चा

भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याचं सुरुवातीला बोललं जात होतं. अहमदाबादमधील फार्महाऊसवर 26 मार्चच्या रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याची माहिती होती. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अहमदाबादेतच होते, असं बोललं जात होतं. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नव्हती.

अमित शाहांची पवार-पटेलांशी गुप्त भेट?

शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित बातम्या :

…म्हणून शरद पवारांनी अनिल देशमुखांकडे गृहमंत्रीपद सोपवले, शिवसेनेचा गौप्यस्फोट

(NCP leader Nawab Malik on Sharad Pawar meeting with Amit Shah in ahmedabad)

धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.