राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला, रात्री 12 वाजता थरार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीवर रात्री बाराच्या सुमारास अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. देवनार टाटानगर येथील वार्ड क्रमांक 140 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोहसिन शेख यांच्यावर हल्ला करुन, हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या स्थानिकांनी मोहसिन शेख यांना झेन रुग्णालयात दाखल केलं. रात्री बाराच्या सुमारास हा थरार रंगला. या हल्ल्याची […]

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला, रात्री 12 वाजता थरार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:58 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीवर रात्री बाराच्या सुमारास अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. देवनार टाटानगर येथील वार्ड क्रमांक 140 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोहसिन शेख यांच्यावर हल्ला करुन, हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या स्थानिकांनी मोहसिन शेख यांना झेन रुग्णालयात दाखल केलं. रात्री बाराच्या सुमारास हा थरार रंगला.

या हल्ल्याची बातमी कळताच ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. पाटील यांनी मोहसिन शेख यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसंच त्यांनी हा हल्ला राजकीय हेतूने झाल्याचा दावा केला आहे.

या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रकरण आणखी वाढू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

हा हल्ला नेमका का झाला? कोणी केला? त्याच्या मागची काय कारणं आहेत, या सगळ्यांचा तपास आता पोलीस करत आहेत. पण निवडणुकीच्या काळामध्ये हा हल्ला झाल्याने त्याला नक्कीच  राजकीय वळण मिळालं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.