लोकसभेला उदयनराजेंना पाडलं, आता एकाचवेळी दोन्ही राजेंना हरवणार, राष्ट्रवादीचा साताऱ्यात मेगाप्लॅन

"तुमच्या निर्णयावर विचार करु. उपमुख्यमंत्री अजितदादा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ, तुम्ही सांगितलेल्या विषयावर मी तिघा नेत्यांशी बसून चर्चा करेन", असा शब्द शरद पवारांनी दीपक पवार यांना दिला.

लोकसभेला उदयनराजेंना पाडलं, आता एकाचवेळी दोन्ही राजेंना हरवणार, राष्ट्रवादीचा साताऱ्यात मेगाप्लॅन
दीपक पवार आणि शरद पवार
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 10:07 AM

सातारा : साताऱ्यात लोकसभा 2019 च्या निवडणुकीत शरद पवारांच्या एका सभेने उदयनराजेंना पराभवाचा बसला. पावसातली सभा मैलाचा दगड ठरली. उदयनराजेंच्या होमग्राऊंडवर उदयनराजेंचा पराभव होऊ शकतो, हे पवार-श्रीनिवास पाटील जोडीने दाखवून दिलं. तसं त्याअगोदरही त्यांचा पराभव दोन-तीन वेळा झाला, पण लोकसभेचा पराभव राष्ट्रवादीसाठी खूप मोठा होता. तीच रणनिती आता पुन्हा एकदा आखली जातीय, त्याला निमित्त ठरलीय, सातारा पालिका निवडणूक…! साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन पालिका निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा केली. यावेळी पवारांनी दोन्ही राजेंना आस्मान दाखवण्यासाठीच्या प्लॅनवर सकारात्मक भूमिका घेतली.

सातारा पालिकेचा रणसंग्राम, दोन्ही राजे विरुद्ध राष्ट्रवादी!

पुढच्या काही महिन्यांवर सातारा नगरपालिका निवडणूक येऊन ठेपलीय. त्याच अनुषंगाने विविध पक्ष, नेते मंडळींची कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या जोर बैठका सुरु झाल्या आहेत. चर्चेच्या फेऱ्या झडायला देखील सुरुवात झाली आहे. याचाच भाग म्हणून दीपक पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक या ठिकाणी ही भेट पार पडली. या भेटीत त्यांनी नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजेंच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा प्रस्ताव पवारांसमोर मांडला. पवारांनीही देखील या प्रस्तावाला सकारात्मक भूमिका दर्शवली.

दीपक पवार यांनी शरद पवारांकडे काय मागणी केली?

“राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 ला झाली. तेव्हापासून आतापर्यंत सातारा पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने कधीही पॅनेल टाकलं नव्हतं. परंतु यंदा आता दोन्ही राजेंच्या विरोधात शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी परवानगी द्या”, अशी मागणी दीपक पवार यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे.

पवारांच्या डोक्यात तोच प्लॅन?

त्यावर “तुमच्या निर्णयावर विचार करु. उपमुख्यमंत्री अजितदादा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करुन योग्य निर्णय घेऊ, तुम्ही सांगितलेल्या विषयावर मी तिघा नेत्यांशी बसून चर्चा करेन”, असा शब्द शरद पवारांनी दीपक पवार यांना दिला.

शिवसेना काँग्रेसला सोबत घेऊन राजेंना मात, साताऱ्यातला राष्ट्रवादीचा मेगाप्लॅन काय?

“शिवसेना आणि काँग्रेसला सोबत घेऊन आपण पॅनेल टाकूया. आपण याआधी कधीही पालिका निवडणुकीत पॅनेल टाकला नव्हता. पण सध्या साताऱ्यातील अनेक इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत किंबहुना सातत्याने विचारणा होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दोन्ही राजेंच्या विरोधात पॅनेल टाकून आपण मात देऊ शकतो”, असा विश्वास दीपक पवार यांनी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केला.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये कुस्ती सुरुच!

सध्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे एकाच पक्षात म्हणजे भाजपमध्ये आहेत. मात्र तरीही त्यांच्यात सगळं काही आलबेल नाहीय, जे कधीच नव्हतं. कुठल्या ना कुठल्या कारणावरुन त्यांच्यात सुंदोपसुंदी सुरुच असते. आता पालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राजे एकत्र येणार का?, हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न… पण याचं प्रश्नाचं उत्तर दोघांच्या वागण्यावरुन ‘नाही’ असं मिळतंय. कारण आठ दिवसांपूर्वी झालेलं बॅनर वॉर आणि उदयनराजेंची तीन शब्दांची कमेंट…!

साताऱ्यातील विकासकामांबाबत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सोबत घेऊन काम करणार का? या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी जनता माझ्या पाठीशी असल्याचे उत्तर देत शिवेंद्रराजे यांना सोबत घेऊन सातारा नगरपालिका निवडणूक लढणार नसल्याचे पुन्हा संकेत दिले आहेत. उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

(NCP Deepak Pawar meet Sharad pawar Over Satara Palika Election)

हे ही वाचा :

शिवेंद्रराजेंना सोबत घेऊन काम करणार का? उदयनराजेंचं तीन शब्दात उत्तर, साताऱ्यात नेमकं काय घडणार?

शिवेंद्रराजेंना मी कोणतंही निमंत्रण दिलेले नाही, पक्षाच्या निष्ठेबद्दल कुणीही काहीही सांगण्याची गरज नाही : शशिकांत शिंदे

साताऱ्यातील मराठा गोलमेज परिषदेकडे उदयनराजेंनी फिरवली पाठ; अनुपस्थितीची रंगली चर्चा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.