भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण पक्षाला सोडून मला मतदान करणार नाहीत- एकनाथ खडसे
आज विधान परिषदेची निवडणूक होतेय. यात विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. अश्यात आपल्या उमेदवारा जिंकवण्यासाठी सगळेच पक्ष जीवाची बाजी लावत आहेत.
मुंबई : भाजपचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण पक्षाला सोडून मला मतदान करणार नाहीत, असं राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी म्हटलंय. आज विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council Election) होतेय. यात विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. अश्यात आपल्या उमेदवार जिंकवण्यासाठी सगळेच पक्ष जीवाची बाजी लावत आहेत. अश्यात भाजपचे (BJP) अनेक आमदार खडसेंच्या संपर्कात असल्याचं त्यांनी याआधीही सांगितलं पण हे आमदार पक्ष निष्ठ आहेत. ते पक्षाला सोडून आपल्याला मतदान करणार नाहीत, असं खडसेंनी स्पष्ट केलं आहे.
संपर्क कायम पण मतदान नाही- खडसे
आज विधान परिषदेची निवडणूक होतेय. यात विधान परिषद निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. अश्यात आपल्या उमेदवारा जिंकवण्यासाठी सगळेच पक्ष जीवाची बाजी लावत आहेत. अश्यात भाजपचे अनेक आमदार खडसेंच्या संपर्कात असल्याचं त्यांनी याआधीही सांगितलं पण हे आमदार पक्ष निष्ठ आहेत. ते पक्षाला सोडून आपल्याला मतदान करणार नाहीत, असं खडसेंनी स्पष्ट केलं आहे.
कार्यकर्त्याचं महादेवाला साकडं
एकनाथ खडसे यांची इडा पिडा जाऊन विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय होवून खडसेंना मंत्री पद मिळण्यासाठी जळगावात खडसे समर्थकांनी महादेवावर दुग्धाभिषेक करत देवाकडे साकडे घातले आहे. एकनाथ खडसे यांच्यावर असलेली पिडा टळून निवडणुकीत खडसेंचा विजय व्हावा व मंत्री होऊन त्यांचे जळगावात पदार्पण व्हावे, असं खडसेंच्या समर्थकांनी महादेवाकडे साकडे घातलं आहे.
राजकीय भविष्याची परीक्षा
सर्वच राजकीय पक्षांसाठी आज सोनियाचा दिनू आहे, असं म्हणता येईल. कारण राज्यसभा निवडणुकीमनंतर आज विधान परिषदेची निवडणूक पार पडतीये. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्ष विजयाचा दावा करत आहेत. अश्यात कोण बाजी मारणार याकडे महाराष्ट्राच्या नजरा आहेत.