पक्ष सोडताना दिल्लीवरुन फोन, पक्ष का सोडता अशी विचारणा : एकनाथ खडसे

मला काही उरलेली विकासकामे पूर्ण करायचे आहेत," असेही एकनाथ खडसेंनी सांगितले.(Eknath Khadse on BJP Chandrakant Patil)

पक्ष सोडताना दिल्लीवरुन फोन, पक्ष का सोडता अशी विचारणा : एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 10:17 AM

जळगाव : “मला आता राजकारणात काही अपेक्षा नाही. मात्र उरलेली कामं पूर्ण करायचे आहे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला आहे. “मी पक्ष सोडत असताना मला दिल्लीवरुन फोन आला होता. त्यावेळी त्यांनी तुम्ही पक्ष का सोडता अशी विचारणा केली होती,” असा खुलासाही यावेळी खडसेंनी केला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना राष्ट्रवादी प्रवेशानंतर खूप काही दिलं आहे, अशी टीका केली होती. यावर खडसेंनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. (Eknath Khadse on BJP Chandrakant Patil)

“मला राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याआधी विचारण्यात आलं होतं. तुम्हाला काय पाहिजे. त्यावेळी तुम्ही मला देऊही शकणार नाही. कारण मी आतापर्यंत इतकं काही घेतलं आहे. जवळपास 15 ते 16 मंत्रिपदाचे खाते, विरोधी पक्षनेताही राहिलो आहे. त्यामुळे राजकारणात काहीही अपेक्षा उरलेल्या नाहीत,” असे एकनाथ खडसे म्हणाले. “पण मला काही उरलेली विकासकामे पूर्ण करायचे आहेत,” असेही खडसेंनी सांगितले.

एकनाथ खडसे मोठा घोटाळा बाहेर काढणार

भाईचंद हिरांचद रायसोनी (बीएचआर) सहकारी बँकेतील तब्बल ११०० कोटी रूपयांच्या घोटाळ्यांवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. या घोटाळ्यात राज्यातील काही बड्या नेत्यांची नावं आहेत. त्यांची यादीच तयार केली आहे, असा गौप्यस्फोट करतानाच ‘ईडी’ने कारवाई करावी असंच हे प्रकरण असून येत्या दोन दिवसात या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

‘खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे’

मी संकट मोचक नाही. मी अडचणीतून मार्ग काढणारा आहे, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नेतृत्व मी स्वीकारलं आहे. आता खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच पवारांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी दणक्यात साजरा करावा, असं आवाहनही त्यांनी केलं. (Eknath Khadse on BJP Chandrakant Patil)

संबंधित बातम्या : 

बीएचआर बँक घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावे, यादी तयार, दोन दिवसांत गुन्हा दाखल होणार; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही; खडसेंचा भाजपला टोला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.