Uddhav Thackeray: खेळ सुरुय बंडाचा? उद्धव ठाकरेच आमदारांना गुवाहटीला पाठवतायत? जयंत पाटलांनाही आश्चर्य

सगळा सत्तासंघर्ष उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार होत असल्याचं बोललं जात आहे. त्यावर जयंत पाटलांनीही भाष्य केलंय.

Uddhav Thackeray: खेळ सुरुय बंडाचा? उद्धव ठाकरेच आमदारांना गुवाहटीला पाठवतायत? जयंत पाटलांनाही आश्चर्य
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 4:12 PM

मुंबई : सध्या एका मागोमाग एक शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला रवाना होत आहेत. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय नेते तिकडे जात आहेत. त्यामुळे शिंदे गटाचा पाठिंबा वाढत आहे. अश्यात शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच (Uddhav Thckeray) या आमदारांना तिकडे पाठवत आहेत का? असा सवाल चर्चिला जातोय. जनतेसह शिवसेनेच्या (Shivsena) मित्रपक्षांच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यावर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

एवढे शिवसेनेचे आमदार एकत्रितपणे आधी सुरतला आणि नंतर गुवाहाटीला कसे गेले, याची सध्या चर्चा आहे. सोशल मीडियावर याविषयी पोस्ट पाहायला मिळत आहेत. हे सगळं उद्धव ठाकरेंच्या म्हणण्यानुसार होत असल्याचं बोललं जात आहे. त्यावर जयंत पाटलांनीही भाष्य केलंय.  हे सगळं अनाकलनीय असल्याचं त्यांनी म्हटलंय.

जयंत पाटील म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हे सरकार वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आमदार फुटतील असं वाटत नव्हतं. पण जे घडलं ते घडलं. एकापाओठपाठ एक आमदार जात आहेत. ते कसं काय जात आहेत त्याचा अंदाज लागत नाहीये. पण उद्धव ठाकरे यांच्या जवळचे लोक जात असल्याने आश्चर्य वाटतंय. मग ते कशासाठी जात आहेत? एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी जात आहेत की त्यांचं आणि इतर आमदारांचं मन परिवर्तन करण्यासाठी जात आहेत की आणखी काही कारणाने याची कल्पना नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांबाबत जयंत पाटील काय म्हणाले?

मुख्मयंत्री वर्षावरुन मातोश्रीत परतले आहेत. यावरही जयंत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. आमच्या आग्रहासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षावर गेले होते. त्यांची मातोश्रीवरुन वर्षावर जाण्याची इच्छा पहिल्यापासूनच नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे. कामासाठी सोयीचं जावं म्हणून ते वर्षावर गेले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये रोखठोक बोलले. यानंतर त्यांनी थेट वर्षा बंगला सोडत मातोश्रीवर जाण्याचा निर्णय जाहीर केला. जाहीर केलेल्या निर्णयप्रमाणे ते रात्री उशिरा मातोश्रीवर परतलेही होते.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.