पडळकरांनी केलेला प्रकार हास्यास्पद आणि केविलपणा, जयंत पाटलांची सडकून टीका
गोपीचंद पडळकरांनी केलेला प्रकार अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणा आहे, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टीका केली. | Jayant patil
जळगाव : काही लोक प्रसिद्धीसाठी काही पण करतात. आततायीपणा किती करायचा, मर्यादेचा भंग करणाऱ्यांबद्दल काय बोलायचे? गोपीचंद पडळकरांनी केलेला प्रकार अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणा आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टीका केली. (NCP Jayant patil Slam Gopichand padalkar Over Ahilyadevi Statue)
पडळकरांनी केलेला प्रकार हास्यास्पद आणि केविलपणा
मंत्री जयंत पाटील हे गेल्या दोन दिवसांपासून ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’निमित्त जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चोपडा शहरातील नगरपालिका प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, आततायीपणा किती करायचा, या मर्यादेचा भंग करणाऱ्या लोकांबद्दल काय बोलायचे. स्थानिक व्यवस्थापनाने ज्यांना निमंत्रित केले आहे, सन्मानाने ज्यांना बोलावले आहे, त्यांच्या हस्ते जे उदघाटन आहे, त्यावरच लोक विश्वास ठेवतात. आता प्रसिद्धीसाठी काही लोक, काहीही करतात. त्यांच्या बद्दल काय सांगणार? हा प्रकार अतिशय हास्यास्पद आहे, असे प्रकार करणे केविलवाणे असल्याची टीकाही त्यांनी केली.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासन स्तरावर काळजी
राज्य शासनाने शिवजयंती सार्वजनिकपणे साजरी करण्यावर बंधने घालून दिली आहेत. शासनाच्या या निर्णयाला विरोधकांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. याबाबत मंत्री जयंत पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याची काळजी शासनाच्या अधिकृत स्तरावरून घेतली जात आहे. त्यानुसार आम्हीही शासनाच्या नियमांचे पालन करत आहोत.
पुजा चव्हाणच्या आत्महत्येवर मौन
कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी आतापर्यंत महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला सहकार्य केले आहे, म्हणूनच महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. यापुढेही जनता सहकार्य करेल, अशी अपेक्षा आहे, असे जयंत पाटील म्हणाले. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी पुण्यातील त्या तरुणीच्या आत्महत्येबद्दल सविस्तर बोलणे टाळले. मी या प्रकरणाबाबत खोलात माहिती घेतलेली नाही, एवढेच सांगून त्यांनी काढता पाय घेतला.
(NCP Jayant patil Slam Gopichand padalkar Over Ahilyadevi Statue)
हे ही वाचा :
पोलिसांनी पूजा चव्हाणचा लॅपटॉप स्कॅन करावा; बऱ्याच गोष्टी बाहेर येतील: चंद्रकांत पाटील
चित्रा वाघ कडाडल्या, “वाट कसली बघताय, मंत्री संजय राठोडांच्या मुसक्या आवळा”