हर्षवर्धन पाटलांच्या बंगल्यासमोर जाऊन अजित पवारांनी कंगवा दाखवला!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar showed comb to Harshvardhan Patil) यांनी काल राजकारणातील कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर सभा घेतली.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar showed comb to Harshvardhan Patil) यांनी काल राजकारणातील कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर सभा घेतली. इंदापूरमध्ये झालेल्या या सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar showed comb to Harshvardhan Patil) जोरदार टीका टिपण्णी केली.
अजित पवार हे इंदापूर येथे आघाडीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटलांवर स्टाईलबाज नेता म्हणून केली टीका.
बारामती आणि इंदापूरचे विळ्या भोपळ्याचे वैर असून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात विस्तव देखील जात नाही . त्यांनी इंदापुरात सभेदरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करताना ते स्टाईलबाज राहतात, केसावरून कंगवा फिरवतात, आता मी काय माझ्या डोक्याला केसच राहिले नाहीत, पण तुम्ही असे समजू नका त्यांच्याकडेच कंगवा आहे, मी पण कंगवा वापरतो असे म्हणून त्यांनी खिशातून कंगवा काढून दाखवला आणि सभेमध्ये एकच हशा पिकला.
सध्या निवडणुकीचे धामधूम असल्यामुळे स्टार प्रचारकांची सभेसाठी धावाधाव होत आहे. त्यातच कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांसमोर भाषणाला संधी मिळाली तर तो माईक सोडायला तयार नसतो, असाच प्रत्यय इंदापूर तालुक्यातील बावडा येथे आला. अजित पवार यांना बावडा गावची सभा उरकून पुढच्या सभेला निघायचे होते, मात्र सूत्रसंचालक भाषणासाठी वेगवेगळ्या नेत्यांची नावे घेऊन भाषण करण्यास सांगत होता. त्यावेळी वेळ होत असल्याने अजित पवार भरसभेत उठून माईककडे जाऊन त्यांनी आपला संताप व्यक्त केला.