मुंबई: महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP leader Ajit Pawar support BJP) विधीमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तास्थापना केली आहे. आज (23 नोव्हेंबर) सकाळी अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी आणि अजित पवार यांनी (NCP leader Ajit Pawar support BJP) उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा पेच सुटला आहे.
सत्तास्थापनेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू.”
Devendra Fadnavis took oath as Maharashtra Chief Minister again,NCP’s Ajit Pawar took oath as Deputy CM,oath was administered by Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan pic.twitter.com/KrejSTXTBd
— ANI (@ANI) November 23, 2019
अजित पवार म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून सरकार स्थापन होत नव्हते. तसेच अनेक मागण्याही वाढत होत्या. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांना याविषयी आधी माहिती दिली होती, पण नंतर मी त्यांना सांगत होतो की कोणी तरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र येऊन आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला.”
#WATCH Mumbai: Devendra Fadnavis takes oath as Maharashtra Chief Minister again, oath administered by Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan. pic.twitter.com/kjWAlyMTci
— ANI (@ANI) November 23, 2019
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री @Dev_Fadnavis जी को महाराष्ट्र के मुख्यमंत्री और श्री @AjitPawarSpeaks को प्रदेश के उपमुख्यमंत्री के रूप में शपथ लेने पर हार्दिक बधाई।
मुझे विश्वास है कि यह सरकार महाराष्ट्र के विकास और कल्याण के प्रति निरंतर कटिबद्ध रहेगी और प्रदेश में प्रगति के नये मापदंड स्थापित करेगी।
— Amit Shah (@AmitShah) November 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे आणि अजित पवार यांचे अभिनंदन केलं.
Congratulations to @Dev_Fadnavis Ji and @AjitPawarSpeaks Ji on taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra respectively. I am confident they will work diligently for the bright future of Maharashtra.
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी