माझ्या निष्ठेवर प्रश्न नको, ‘त्या’दिवशी मी दुपारी एकपर्यंत झोपलो होतो : धनंजय मुंडे

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर रोजी बंडखोरी करत भाजपला समर्थन देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदारहीसोबत होते.

माझ्या निष्ठेवर प्रश्न नको, 'त्या'दिवशी मी दुपारी एकपर्यंत झोपलो होतो : धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Nov 25, 2019 | 8:36 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर रोजी बंडखोरी करत भाजपला समर्थन देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 10 ते 12 आमदारहीसोबत होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंचाही (Dhananjay munde clarification on ajit pawar) यामध्ये समावेश होता, अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र यावर धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिले आहे. मी राष्ट्रवादीचा एकमेव निष्ठावंत कार्यकर्ता आहे, असं मुंडेंनी (Dhananjay munde clarification on ajit pawar) सांगितले.

“मी राष्ट्रवादीचा एकमेव निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मी शरद पवार यांच्यासोबतच आहे. त्यादिवशी घटना घडली तेव्हा मी एक वाजेपर्यंत झोपलेला होतो. मला याबद्दल काही माहित नव्हते. त्यामुळे मला माध्यमांसमोर यायला वेळ लागला”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

“निवडणूक सगळ्यांनी एकत्र लढवली. पण त्यानंतर अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेतला तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझे अजित पवार यांच्यावर प्रेम ही गोष्ट वेगळी आहे. पण त्यांनी घेतलेल्या निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे”, असंही मुंडेंनी सांगितले.

मुंडे म्हणाले, “माझ्या बंगल्यावर काय झाले हे मला माहित नाही, तो सार्वजनिक आहे. मला याबद्दल काही माहित नव्हते. माध्यमांनी लोकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत”

दरम्यान, ग्रँड हयातमध्ये आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी तिन्ही पक्षाचे आमदार उपस्थित होते. आमदारांची फोडाफोड होऊ नये यासाठी तिन्ही पक्षांकडून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.