…त्यासाठी भाजपाला दहा जन्म घ्यावे लागतील, रोहित पवारांच्या आरोपावर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला

रोहित पवार यांनी भाजपावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.

...त्यासाठी भाजपाला दहा जन्म घ्यावे लागतील, रोहित पवारांच्या आरोपावर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 2:09 PM

मुंबई : दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिवसेनेनंतर (Shiv sena) आता राष्ट्रवादी (NCP) फोडण्याचा भाजपाचा डाव असल्याचं म्हटलं होतं. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशभरातील प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व संपवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यांनी अनेकदा राष्ट्रवादी फोडण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र राष्ट्रवादी फोडण्यासाठी भाजपाला दहा जन्म घ्यावे लागतील, तरी देखील त्यांच उद्दिष्ट साध्य होणार नसल्याचा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

दरम्यान त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळणार का? या प्रश्नाला देखील मिश्किल उत्तर दिले आहे. भाजप काय मला विचारून मंत्र्यांची यादी ठरवत नाही. तसं झालं असतं तर मला आनंदच झाला असता असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. पकंजा मुंडे यांनी आधी देखील मंत्री म्हणून काम केलं आहे, त्यामुळे त्या मंत्री म्हणून कसं काम करतील हे मला विचारण्याऐवजी त्यांनाच विचारलं पाहिजे असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे रोहित पवार यांचा आरोप ?

भाजप शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. असा आरोप रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केला आहे. त्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. भाजप देशभारातील सर्वच प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. मात्र राष्ट्रवादी संपवायला भाजपाला दहा जन्म घ्यावे लागतील तरी राष्ट्रवादी पक्ष संपणार नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.