राज्यपालांना अभिभाषण पूर्ण करु द्यायला हवं होतं, एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना फटकारलं

राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर जे काही राजकारण करायचे होते ते केले असते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.

राज्यपालांना अभिभाषण पूर्ण करु द्यायला हवं होतं, एकनाथ खडसेंनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना फटकारलं
भाजपचा आक्रोश मोर्चा म्हणजे दुटप्पीपणाः एकनाथ खडसेImage Credit source: File Photo
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 5:11 PM

जळगाव: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आपलं अभिभाषण अर्धवट सोडून निघून गेल्याची घटना पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या (Maharashtra ) इतिहासात घडली आहे. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अर्वाच्य घोषणा दिल्याची बातमी समोर आली आहे. मात्र, माझ्या मते दोन्ही बाजूने घोषणा प्रति घोषणा झाल्या व या गदारोळामुळे राज्यपालांना आपलं अभिभाषण संपवावं लागले. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर जे काही राजकारण करायचे होते ते केले असते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधकांसह सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषण सुरु केल्यानं सभागृहात गदारोळ सुरु होता. यानंतर राज्यापालांनी लगेचच भाषण थांबवलं आणि ते विधानभवन परिसरातून बाहेर पडले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप वाढले आहेत. आता, एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही या मुद्यावरुन फटकारलं आहे.

राज्यपालांना अभिभाषण पूर्ण करु द्यायला हवं होतं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळं वाद निर्माण झाला होता. त्या वादाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनात उमटले आहेत. सत्ताधारी आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या. यावेळी विरोधकांकडून देखील घोषणाबाजी सुरु होती. याच दरम्यान राज्यपालांनी अभिभाषण थांबवलं. यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर एकनाथ खडसे यांनी राज्यातील राजकारण्यांच्या कान टोचले आहेत. राज्यापालांच्या अभिभाषणानंतर राजकारण करता आलं असतं. त्यांना अभिभाषण पूर्ण करुन द्यायला हवं होतं, असं खडसे म्हणाले.

ओबीसी आरक्षणासंदर्भातील निर्णय दुर्दैवी

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात दिलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्य मागासवर्गीय आयोगाने सादर केलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला आहे. मात्र, अजूनही याचा सखोलपणे अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने राज्य सरकार कमी पडले असून केंद्र सरकारने इम्पेरियल डाटा राज्य सरकारला दिला असता तर तीन महिन्यात मागासवर्गीय आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी जी कसरत करावी लागली ती करावी लागली नसती. दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाने अहवाल स्वीकारला नसल्याने हा ओबीसींवर अन्याय असल्याचे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे.

भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप

नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, भाजपचाच दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. दहशतवादावर नाक मुरडणाऱ्या भाजपला पार्टी फंड देणारा इक्बाल मिरची हा दहशतवादी असल्याचा आरोप करत थेट भाजपवर एकनाथ खडसेंनी निशाणा साधला आहे.

इतर बातम्या :

Russia Ukraine War : अमेरिका, इग्लंड, जपानचा झेंडा रशियाने काढला, तिरंगा मात्र सही सलामत, रशियाच्या मनात नेमकं काय?

मोठी बातमीः औरंगाबाद महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टात सुनावणी, प्रभाग रचनेसंदर्भात काय आदेश?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.