जुन्या परंपरा मोडीत काढण्यात भाजपचा हातखंडा; राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून जयंत पाटलांचा टोला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लवकर निर्णय घेणे अभिप्रेत असल्याचे सांगितले. | Jayant Patil

जुन्या परंपरा मोडीत काढण्यात भाजपचा हातखंडा; राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीवरून जयंत पाटलांचा टोला
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 8:40 PM

सांगली: राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीला होत असलेल्या विलंबावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपला टोला लगावला आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा आणि व्यवस्था मोडीत काढण्यात भाजपचा हातखंडा आहे. मात्र, राज्यपाल (Bhagat Singh Koshyari ) हे स्वतंत्र विचारांचे आहेत. ते लवकरच विधानपरिषदेसाठी राज्य मंत्रिमंडळाने सुचविलेल्या नावांना मान्यता देतील, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली. (governor still not accepted names of 12 MLC nominees send by Mahavikas Aghadi govt)

ते गुरुवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांना विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लवकर निर्णय घेणे अभिप्रेत असल्याचे सांगितले. राज्य मंत्रिमंडळाने सुचविलेली 12 नावे योग्य आहेत. त्यामुळे राज्यपालांनी 15 दिवसांत याबाबतचा निर्णय घ्यावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

राज्याच्या मंत्रिमंडळाने केलेल्या सूचना राज्यपाल डावलत नाही, अशी प्रथा आपल्याकडे आहे. मात्र, पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्था आणि प्रथा मोडण्यात भाजपचा हातखंडा आहे. परंतु, राज्यपाल हे स्वतंत्र विचारांचे असल्याने ते लवकरच मंत्रिमंडळाने सुचविलेल्या नावांना मान्यता देतील, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

‘प्रतिस्पर्धी पक्षाच्या आमदारांना भाजप जाणीवपूर्वक अडचणीत आणतेय, हे जनतेला समजलंय’

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ‘ईडी’कडून करण्यात आलेल्या कारवाईसंदर्भात जयंत पाटील यांनी भाष्य केले. त्यांनी प्रताप सरनाईक यांचे समर्थन केले. प्रतिस्पर्धी पक्षाच्या आमदारांना भाजप जाणीवपूर्वक अडचणीत आणतेय, अशी भावना जनतेच्या मनात निर्माण होत आहे. प्रताप सरनाईक हे बांधकाम उद्योजक आहेत. ठाणे शहरात व्यवसाय करुन ते मोठे झाले. त्यांनी कोणताही राजकीय फायदा घेऊन काम केलेले दिसत नाही. तरीही प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई झाली. मात्र, सत्य लवकरच बाहेर येईल. ही कारवाई चुकीची असल्याचे लोकांच्या लक्षात येईल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

राज्यपाल नियुक्त आमदारकी म्हणजे नेत्यांची सोय लावण्याची जागा नाही : प्रवीण दरेकर

राज्यपाल समजूतदार आहेत, आमदारकीसाठी पाठवलेल्या नावांवर लवकरच निर्णय घेतील: छगन भुजबळ

झहीर खान, मकरंद अनासपुरे, इंदोरीकरांना आमदार करा, 12 धडाकेबाज नावं घेऊन सदाभाऊ राज्यपालांच्या भेटीला

(governor still not accepted names of 12 MLC nominees send by Mahavikas Aghadi govt)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.