आधी फेसबुक पोस्ट, आता बैठक बोलावली, जयदत्त क्षीरसागर मोठा निर्णय घेणार?

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या एका फेसबुक पोस्टने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. क्षीरसागर यांनी वज्रमूठ असलेल्या फोटोसोबत लढा असं लिहून पोस्ट केल्याने, ते कोणाविरुद्ध लढा उभारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्ष- […]

आधी फेसबुक पोस्ट, आता बैठक बोलावली, जयदत्त क्षीरसागर मोठा निर्णय घेणार?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या एका फेसबुक पोस्टने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. क्षीरसागर यांनी वज्रमूठ असलेल्या फोटोसोबत लढा असं लिहून पोस्ट केल्याने, ते कोणाविरुद्ध लढा उभारणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्ष- दोन वर्षात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पुतणे जिल्हा परिषद सदस्य संदीप क्षीरसागर यांना पक्षातीलच काही ज्येष्ठ मंडळींकडून रसद पुरवली जात असल्याने काका जयदत्त नाराज होते. नेत्यांचे दौरे असोत की पक्षाचा कार्यक्रम, जयदत्त क्षीरसागर हे चार हात लांबच होते.

लोकसभा निवडणुकीत उमेदवार देण्यापासून ते अर्ज दाखल करेपर्यंत ते कुठेच दिसले नाहीत. ते काय निर्णय घेणार याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. दरम्यान 5 एप्रिल रोजी त्यांनी आपल्या समर्थकांची एक व्यापक बैठक बीड येथे बोलावली आहे. त्यात ते आगामी वाटचाल स्पष्ट करुन निर्णय घेणार आहेत.

वाचा –  आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ 

जयदत्त क्षीरसागर हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्यांसोबत दिसतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत त्यांनी अनेकवेळा मंच शेअर केला आहे.

जयदत्त क्षीरसागर हे ओबीसींचे नेतृत्व करत आहेत. मुस्लिमही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करतात. मात्र जयदत्त क्षीरसागर हे भाजपमध्ये गेल्यानंतर मुस्लिम कार्यकर्ते नाराज होणार नाही याचीही काळजी आता जयदत्त क्षीरसागर यांना घ्यावी लागणार आहे. पण जयदत्त क्षीरसागर जिथे जातील तिथे त्यांना पाठिंबा देऊ असं काही कार्यकर्ते दावा करत आहेत.

गेल्या दोन वर्षपासून जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर नाराजी व्यक्त करत भाजपसोबत जवळीक केली हे उघड आहे. शांत संयमी नेते म्हणून जयदत्त क्षीरसागर यांनी राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला आहे. मात्र सध्या ते अस्वस्थ असल्याने कार्यकर्तेही संभ्रमात पडले आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना, क्षीरसागर कुठल्याच स्टेजवर दिसत नसल्याने, कार्यकर्ते पुरते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे उद्या एक विशेष बैठक बोलावण्यात आली असून, उद्याच्या निर्णयावर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन लढा असा संदेश देत पोस्ट केल्याने, त्यांचा हा लढा नेमका कोणाविरुद्ध अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र याचा निर्णय शुक्रवारच्या बैठकीनंतर समजणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.