आधी म्हणाले जनरेशन नेक्स्टला पवारांचं राजकारण कळणार नाही, आता म्हणतात ‘ती’ निव्वळ अफवा
हा संभ्रम दूर होण्यासाठी खुद्द शरद पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, शरद पवार यांची प्रकृती सोमवारी अचानक बिघडली. | Jitendra Awhad Sharad Pawar

मुंबई: कालपर्यंत नव्या पिढीला शरद पवार (Sharad Pawar) यांचं राजकारण कळणार नाही, असं बोलणाऱ्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या भूमिकेत आता पूर्णपणे बदल झाला आहे. पवार साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. पवार-शाह भेटीच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत. प्रसारमाध्यमांकडून हा विषय विनाकारण चघळला जात आहे, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (NCP leader Jitendra Awhad on Sharad Pawar and Amit Shah meet)
भाजपचे चाणक्य अमित शाह यांनी पवारांच्या भेटीविषयी सूचक वक्तव्य करून संभ्रम आणखीन वाढवला होता. हा संभ्रम दूर होण्यासाठी खुद्द शरद पवार काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, शरद पवार यांची प्रकृती सोमवारी अचानक बिघडली. पोटात दुखू लागल्याने शरद पवार मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. याठिकाणी तपासणी झाल्यानंतर 31 मार्चला शरद पवार यांच्यावर एण्डोस्कोपीची (endoscopy) शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती समोर आली. परिणामी शरद पवार आणखी काही दिवस प्रसारमाध्यमांसमोर येऊ शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यामुळे अमित शाह आणि त्यांच्या भेटीबाबतच्या गोष्टींवरून आणखी तर्कवितर्क लढवले जाण्याची शक्यता आहे.
पवार साहेब-अमित शहा भेट झाली नाही. ही काळ्या दगडावराची पांढरी रेघ आहे. तरी देखिल आमचे काही पत्रकार मंडळी रंग उधळत आहेत. चघळायला काही नसले कि अफवेभवती दोन दिवस घालवता येतात. हेच या बातमीच्या रूपाने सिद्ध होतं. माझ्या सर्व पत्रकार बांधवांना होळीच्या शुभेच्छा! बुरा ना मानो होली है.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 29, 2021
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?
शरद पवार आणि अमित शहा यांची गुप्त भेट झाली तर तुमचे कोण गुप्तहेर होते हे माहीत नाही. पण 50 वर्षांच्या राजकीय जीवनात कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी जेवढे मित्र कमावले नाहीत तेवढे मित्र पवार साहेबांनी कमावले आहेत.
मग त्यातील कश्मीरचे फारूक अब्दुल्ला असतील, ओदिशातील विजू पटनाईक असो बंगाल मधले जोत्या बसू असो. ज्या ज्या राज्याचे प्रमुख नेते आहेत ते कायम शरद पवार यांचे मित्र राहिलेत. आपल्या राज्यातील भाजप नेते प्रमोद महाजन हे यांच्याशीही शरद पवार यांचे जवळचे संबंध होते. संबंध आणि राजकारण याचा विचित्र प्रकार आता नवीन पिढीच्या राजकारणात आलाय. राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो, तो फक्त वैचारिक विरोधक असतो, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली होती.
संबंधित बातम्या:
Sharad Pawar health update : पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?
पवार-शहा भेट झालीच नाही, अफवांची धुळवड थांबवा; संजय राऊतांचं ट्विट
अमितजींचा निर्णय मान्य, काही ठरलंच तर पहाटेच्या शपथविधीसारखं झाल्यावर कळेल: चंद्रकांत पाटील
(NCP leader Jitendra Awhad on Sharad Pawar and Amit Shah meet)