80 हजार नोकऱ्या,1.54 लाख कोटींची उलाढाल असलेल्या प्रकल्पांपाठोपाठ आणखी एक मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेला

दोन प्रकल्पांपाठोपाठ आणखी एक मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

80 हजार नोकऱ्या,1.54 लाख कोटींची उलाढाल असलेल्या प्रकल्पांपाठोपाठ आणखी एक मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेला
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 8:25 PM

मुंबई : वेदांत आणि फॉसकॉनच्या सेमी कंडक्ट हा महाराष्ट्रातील 1.54 लाख कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला. या पाठोपाठ 80 हजार नोकऱ्या देणाऱ्या बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेला. या दोन प्रकल्पांपाठोपाठ आणखी एक मोठा प्रोजेक्ट गुजरातला गेला असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीने केला आहे. ठाकरे गटाचे आमदार तथा युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील या आरोपांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे.

टाटा एअरबसचा नागपुरात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोपा राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचा आरोप काँग्रेसने फेटाळला आहे.

आधीच दोन प्रकल्प गेले आहेत. आत्ता हा एअरबस प्रकल्प देखील गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन हे प्रकल्प कसे येतील यासंदर्भात प्रयत्न करायला पाहिजे अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

भाजप नेते केशव उपाध्ये यांनी हे आरोप फेटाळले आहेत. जो प्रकल्प एक वर्षापूर्वी गुजरातला गेला. त्यावर आज टीका करण हे एका अर्थाने अपयश लपविण्याचा प्रयत्न आहे असा पलटवार उपाध्ये यांनी केला आहे.

ज्या एअर बस प्रकल्पावरुन वाद निर्माण केला जात आहे. सप्टेंबर 2021 मध्ये जेव्हा सांमजस्य करार झाला तेव्हा एअर बस आणि केंद्रातल्या समिती सोबत त्याच्यानंतर राज्यात मविआ सरकार होते.

उद्धव ठाकरे यांनी एक सिंगल पत्र पाठपुराव्यासाठी केल्याचे मविआ सरकारने दाखवावे. त्यांनी कोणताच पाठपुरावा केला नाही. यानंतर एक वर्षापुर्वी प्रकल्प गुजरातला गेला असा दावा उपाध्ये यांनी केला.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.