पवार माझे बाप म्हणायचं, अशोभनीय वक्तव्यही करायचं, रुपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात

गेल्या दोन दिवसांपासून चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यात सोशल मीडियावर वॉर रंगले आहे (Rupali Chakankar Chitra Wagh Sharad Pawar)

पवार माझे बाप म्हणायचं, अशोभनीय वक्तव्यही करायचं, रुपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात
चित्रा वाघ, शरद पवार, रुपाली चाकणकर
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 8:07 AM

मुंबई : एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? असा सवाल करत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर शरसंधान साधले आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही नेत्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर रंगले आहे. (NCP Leader Rupali Chakankar taunts BJP Leader Chitra Wagh over Sharad Pawar Dilip Walse Patil Comment)

“राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती. एकीकडे मी पवार साहेबांच्या तालमीत वाढले, ते माझे बाप आहेत म्हणायचं आणि दुसरीकडे असं अशोभनीय वक्तव्य करायचा दुटप्पीपणा कसा जमत असेल? कर्तव्यनिष्ठ ही दिलीपराव वळसे पाटीलसाहेबांची ओळख आहे. कारवाई होऊ नये म्हणून पक्ष बदलणाऱ्या लाचखोरांनी जरी त्यांना आज शुभेच्छा दिल्या असल्या तरी ते अशा गुन्हेगारांना सोडणार नाहीत. गृहमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल साहेबांचे मनपूर्वक अभिनंदन.” अशा शब्दात नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा देताना चाकणकरांनी चित्रा वाघ यांना अप्रत्यक्षपणे झापलं.

राजकीय उदरनिर्वाहासाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या काही लोकांना नवीन वसुलीमंत्री कोण याची काळजी लागली होती. एकीकडे मी पवार…

Posted by Rupali Chakankar on Tuesday, 6 April 2021

कसा रंगला सोशल मीडिया वॉर?

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ यांची टीका

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती.  आता प्रश्न उरतो की, नवा वसूली मंत्री कोण? एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू बदलणार नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली होती. (NCP Leader Rupali Chakankar taunts BJP Leader Chitra Wagh over Sharad Pawar Dilip Walse Patil Comment)

चित्रा वाघ यांच्या टीकेला रुपाली चाकणकरांचं उत्तर

“ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण??अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल.थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!” अशा शब्दात चाकणकर यांनी सुनावलं होतं.

दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा

महाराष्ट्रात महिला मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी कठोर पावले उचलत घटनांची तात्काळ दखल घ्याल ह्या अपेक्षांसह मन:पूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना चित्रा वाघ यांनी शुभेच्छा दिल्या. त्याला चाकणकरांनी उत्तर दिलं.

हे ही वाचा :

आता नवा वसुली मंत्री कोण? अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर चित्रा वाघ कडाडल्या 

चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?, चाकणकरांचा पलटवार

(NCP Leader Rupali Chakankar taunts BJP Leader Chitra Wagh over Sharad Pawar Dilip Walse Patil Comment)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.