मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील (Rupali Patil) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. याला चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर केकेल्या टिकेची किनार आहे. “स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती महाकाली तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते”, अश्या शब्दात रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्ला चढवलाय. याशिवाय त्यांनी “बेताल ,सत्तापिपासू चंपा!”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं आहे.
रूपाली पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ट्विटच्या माध्यामातून टिकास्त्र सोडलंय. “स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती महाकाली तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते. बेताल ,सत्तापिपासू चंपा!”, असं म्हणत रूपाली पाटलांनी चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं आहे.
स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते.
मसनात असणारी महाकाली असते,
ती तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्या शिवाय शांत होत नसते .
बेताल ,सत्तापिपासू चंपा.@abpmajhatv @zee24taasnews @SakalMediaNews @TV9Marathi @LoksattaLive @NCPspeaks— Rupalipatilthombare (@Rupalispeak) May 25, 2022
काल भाजपकडून ओबीसी आरक्षणासंदर्भात पु्ण्यात मोर्चा काढण्यात आला होता. यात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. “तुम्ही राजकारणात कश्यासाठी राहत आहात. घरी जा, स्वयंपाक करा…”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रोटोकॉलही समजावला. ते म्हणाले, “तुम्ही खासदार आहात ना, मुख्यमंत्र्यांची भेट कशी घेतात, हे तुम्हाला माहित नाही? शिष्टमंडळ पाठवायचं असतं एवढंही माहित नाही. आता तुम्ही घरी जाण्याची वेळ आली आहे.” त्यापुढे ते म्हणाले, “आम्ही दिल्लीत जा, नाही तर मसनात जा… पण आरक्षण द्या!”
भाजपकडून ओबीसी आरक्षणासंदर्भात काल पु्ण्यात मोर्चा काढण्यात आला. यात राज्यभरातील भाजपचे ओबीसी नेते सहभागी झाले होते. खासदार प्रितम मुंडे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार,गोपीचंद पडळकर या नेत्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातील चंद्रकांत पाटलांच्या भाषणाची विशेष चर्चा झाली. यात त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली. याचाच रूपाली पाटील यांनी आज त्यांच्या स्टाईलमध्ये समाचार घेतला.