शरद पवार यांच्याकडून अमित शाह यांच्या तडीपारीचा पहिल्यांदाच उल्लेख; घणाघाती टीका करत म्हणाले, ज्या माणसाला…

आज देशाची परिस्थिती बदलली आहे. देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी निवडणुकीत काय बोलत होते? देशाची रक्षा त्यातून होत नाही. त्यांनी बंगळूरमध्ये सांगितलं आम्हाला 400 पार करायचे आहेत. त्यांना संविधान बदलायचं होतं. देशाचं संविधान देशाच्या प्रत्येक व्यक्तीला अधिकार देतं. ते बदलणं लोकांना आवडलं नाही. यामुळे लोकांनी त्यांना धडा शिकवला आहे, असा टोला माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी लगावला.

शरद पवार यांच्याकडून अमित शाह यांच्या तडीपारीचा पहिल्यांदाच उल्लेख; घणाघाती टीका करत म्हणाले, ज्या माणसाला...
Follow us
| Updated on: Jul 27, 2024 | 11:26 AM

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावर पलटवार केला आहे. अमित शाह यांनी शरद पवार हे देशभरातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना पवार यांनी शाह यांच्या तडीपारीचा उल्लेख केला. ज्या माणसाला सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलं आहे. त्याच्या हातात देशाचं गृहमंत्रीपद आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमाला संबोधित करताना शरद पवार यांनी हा हल्ला चढवला.

शरद पवार यांच्यावरील पुस्तकाचं आज प्रकाशन झालं. त्यावेळी ते बोलत होते. अमित शाह होम मिनिस्टर आहेत. अमित शाह म्हणाले की, देशातील जेवढे भ्रष्टाचारी आहेत, त्याचे सरदार शरद पवार आहेत. अमित शाह आधी गुजरातचे मंत्री होते. तेव्हा कायद्याचा चुकीचा वापर केला म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शाह यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. ज्या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं, तो माणूस आज देशाचं गृहमंत्रीपद सांभाळतोय. देशाचं संरक्षण करतोय, असा हल्लाच शरद पवार यांनी चढवला.

माझा बोटांवर विश्वास

यावेळी शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी मी शरद पवार यांचं बोट पकडून राजकारणात आलोय, असं आपल्या भाषणात म्हटलं. टोपे यांच्या या विधानवर शरद पवार यांनी कोटी केली. ते म्हणाले, टोपे म्हणतात की ते माझं बोट पकडून राजकारणात आले. पण मी त्यांच्या मताशी सहमत नाही. कारण एके दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका भाषणात मी शरद पवार यांचं बोट पकडून राजकारणात आलोय असं म्हटलं होतं. पण मी कुणाच्याही हातात माझं बोट देत नाही, देणार नाही. कारण माझ्या बोटावर माझा पूर्ण विश्वास आहे, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

म्हणून नामविस्ताराचा निर्णय घेतला

यावेळी त्यांनी प्रकाशित झालेल्या पुस्तकावर भाष्य केलं. माझ्याबद्दल इथे खूप चांगलं बोललं गेलं. मी हे पुस्तक 10 ते 12 वर्षापूर्वी लिहिलं होतं. त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या. आज जे काय घडतंय ते लिहिणं गरजेचं आहे. एक प्रकारचा संघर्ष करण्याची वेळ आली होती, असं सांगतानाच शरद पवार यांनी मराठवाडा नामविस्तार आंदोलनाच्या आठवणी जागवल्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला खूप चॅलेंज होते. त्यावेळच्या पोलीस आयुक्तांनी खूप मेसेज केले. अनेकांचे घर जळत आहेत. निर्णय लोकांना मान्य नाही. यात बदलणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. डॉ. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. त्यांच्या नावाने असलेलं विद्यापीठ का नको? त्याला विरोध का? त्यावेळी सक्तीचं निर्णय घेणं गरजेचं होत. म्हणून मी निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले.

अन् महिलांना सैन्यात प्रवेश मिळाला

मी अमेरिकेत गेलो, तेव्हा डिफेन्स मिनिस्टर होतो. मी विमानतळावरून पुढे गेलो. तिथे सैनिकांनी सॅल्यूट केला. तिथल्या सैन्यात सर्व मुली होत्या. तिथे सैनिकाची जबाबदारी महिलांवर होती. मग हे भारतात का नको? असा प्रश्न मला पडला. मी हे इथल्या अधिकारांना बोललो. ते म्हणाले हे शक्य नाही. मग एक महिन्यानंतर मी परत विषय काढला. तेव्हाही अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा विषय काढला.तेव्हाही अधिकाऱ्यांचा नकार आला. त्यानंतर मी महिलांवर सैन्याची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले. मी सैन्याची जबाबदारी महिलांना दिली पाहजे असा निर्णय घेतला. आपल्या एअर फोर्समध्ये अपघात अधिक होतात. सैन्यात महिलांना संधी दिली. त्यानंतर अपघात कमी झाले. सैन्यातल्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं हे कसं झालं? महिला नेहमी लक्षपूर्वक काम करतात. त्यामुळेच अपघात कमी झाले आहेत, असंही शरदप पवार यांनी सांगितलं. महिलांना आरक्षण देण्याच्या निर्णयाबद्दल लोक सुरुवातीला नाराज होते. मात्र आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहे. चांगलं काम करत आहेत, असंही ते म्हणाले.

दोन लाख घरे बांधली

गणेश उत्सव होता, विसर्जन करायचं दिवस असला तर अधिकारी झोपू शकत नाहीत. करणं प्रत्येक ठिकाणी लक्ष द्यावं लागतं. गणेश विसर्जन होतं, रात्री 4 पर्यंत जागलो. मला अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आता लोक जबाबदारीने वागत आहे. मात्र 4 वाजता मला माहिती मिळाली की लातूरमध्ये भूकंप झाला. मी रात्री अधिकाऱ्यांना उठवून हेलिकॉप्टरने तिथे पोहोचलो होतो. घरं पडली, लोकांना लागले, रक्त सांडले होते. मी तिथे 15 दिवस तिथे थांबून एका वर्षात 2 लाख घरे बांधली. समस्या सोडवण्याची तयारी असले तर प्रश्न सुटतात हे मी लातूर भूकंपात शिकलो, अस्ंही त्यांनी स्पष्ट केलं.

खोटं बोललो, मुंबई शांत झाली

मुंबईत 1992ला दंगल झाली. मला दंगल आटोक्यात आणण्यासाठी पाठवलं. मुंबई शांत होत नव्हती. त्याला हिंदू मुस्लिम दंग्याचं स्वरुप येत होतं. त्यानंतर मी मीडियाशी संवाद साधला. कराचीतून आरडीएक्स आलं असेल आणि शेजारील देशाचं हे षडयंत्र असेल असं मी सांगितलं. मोहम्मद अली रोडवरही बॉम्बस्फोट झाल्याचं मी मीडियाला खोटं सांगितलं. त्यामुळे दोन्ही समाजाला वाटलं की ही हिंदू-मुस्लिम दंगल नसून वेगळा प्रकार आहे. त्यामुळे मुंबई शांत झाली, असा किस्साही त्यांनी ऐकवला.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.