India Vs Pakistan Match: क्रिकेटच्या मैदानात हार्दिक पंड्याची धुव्वाधार बॅटिंग, सोशल मीडियाच्या पिचवर शरद पवारांची हवा, पाहा व्हीडिओ…

Sharad Pawar: मॅच जिंकल्यानंतर सगळीकडे हार्दिक आणि त्याच्या सिक्सची सर्वत्र चर्चा झाली. पण याचवेळी सोशल मीडियावर एक व्हीडओने धुमाकूळ घातला. हा व्हीडिओ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आहे.

India Vs Pakistan Match: क्रिकेटच्या मैदानात हार्दिक पंड्याची धुव्वाधार बॅटिंग, सोशल मीडियाच्या पिचवर शरद पवारांची हवा, पाहा व्हीडिओ...
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 12:16 PM

मुंबई : भारताने आशिया कपच्या भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan Match) सामन्याकडे अवघा देश डोळे लावून बसला होता. हो नाही करता करता भारतानं मॅच जिंकली. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) सिक्सने सगळा गेम पलटला. ही मॅच जिंकल्यानंतर सगळीकडे हार्दिक आणि त्याच्या सिक्सची सर्वत्र चर्चा झाली. पण याचवेळी सोशल मीडियावर एक व्हीडओने धुमाकूळ घातला. हा व्हीडिओ आहे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा. मॅच जिंकता क्षणी शरद पवार यांनी आपला हात उंचावत व्हिक्ट्रीची साईन दाखवली. मॅच संपता क्षणी अनेकांच्या व्हॉट्सअप स्टेटसला हा व्हीडिओ ठेवला होता. त्याचबरोबर फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरही हा व्हीडिओ पाहायला मिळाला. त्यांचा हा व्हीडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे. अवघ्या 11 सेकंदाचा व्हीडिओ अनेकांची मनं जिंकतोय.

व्हीडिओमध्ये काय आहे?

शरद पवार यांचा व्हायरल होत असलेला व्हीडिओ अवघ्या 11 सेकंदाचा आहे. पण या व्हीडिओने अनेकांची मनं जिंकली आहेत. शेकडो लोकांनी आपल्या सोशल मीडियावर हा व्हीडिओ शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये शरद पवार निंवात क्रिकेटचा आनंद घेताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे, मुलगा विजय सुळे दिसत आहेत. त्यांच्या या व्हीडिओला अनेकांनी पसंती दिली आहे. “जिंदादिल इन्सान…” म्हणत अनेकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे.

हे सुद्धा वाचा

सुप्रिया सुळेंचं ट्विट

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या व्हीडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. त्याला त्यांनी “आजचा रविवारचा दिवस आनंदी बनवल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे आभार!”, असं कॅप्शन दिलं आहे. सुप्रिया सुळेंच्या ट्विटवर या व्हीडिओला दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर 14 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे.

भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला. हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमार भारताच्या विजयात महत्वाचे भागिदार ठरले. चार चेंडूत विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. हार्दिकने एक चेंडू निर्धाव खेळला. 3 चेंडूत विजयासाठी 6 धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पुढच्याच चेंडूवर हार्दिकने थेट षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केलं.

पवारांचं क्रिकेट प्रेम

शरद पवार यांचं खेळांवर विशेष प्रेम आहे. त्यातही क्रिकेट त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. ते भारतीय क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षदेखील राहिले आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.