“कोश्यारीजी, कंबोज-सोमय्या यांच्यासारखे लोक मुंबईतून हाकलून लावा, आमच्या इथली घाण साफ होईल”, विद्या चव्हाण कडाडल्या…

Vidya Chavan: भाजपचे नेते मोहित कंबोज यांच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्याला आता विद्या चव्हाण यांनी जश्यास तसं उत्तर दिलं आहे.

कोश्यारीजी, कंबोज-सोमय्या यांच्यासारखे लोक मुंबईतून हाकलून लावा, आमच्या इथली घाण साफ होईल, विद्या चव्हाण कडाडल्या...
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 10:46 AM

मुंबई : ” राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक गेले तर काहीच उरणार नाही. आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. मोहित कंबोज (Mohit Kamboj), किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यासारखे लोक मुंबईतून हाकलून लावा. हे लोक महाराष्ट्राचा अपमान करतात.त्यांचं इथं काहीही काम नाही. ते गेले तर आमच्या मुंबईतील घाण साफ होईल. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना जर त्यांचा पुळका असेल तर त्यांना दिल्लीला घेऊन जावं. त्यांना सांभाळावं. इथे राहून ते केवळ बेछूट आरोप करत असतात. आता असले उद्योग त्यांनी बंद करावेत”, असं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण (Vidya Chavan) म्हणाल्या आहेत. विद्या चव्हाण यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना आपलं मत मांडलं.

सोलापुरात कंबोज यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं त्यावर विद्या चव्हाण यांना विचारण्यात आलं तेव्हा मोहित कंबोज सारख्या लोकांना जोडे नाही मारणार तरा काय करणार?, असं चव्हाण म्हणाल्या आहेत. कंबोज तु किरीट सोमय्याचा बाप बनायला लागला की की?, असा सवालही विद्या चव्हाण यांनी विचारला आहे.

हे सुद्धा वाचा

निवडणुकीदरम्यानचा ‘तो’ किस्सा

विद्या चव्हाण यांनी निवडणुकीदरम्यानचा किस्सा सांगितला आहे. “भाजपचे बरेचसे नेते माझ्या ओळखीचे आहेत. पण मोहित कंबोज कोण त्यांना मी ओळखत नाही. ते माझ्या परिचयाचे नाहीत. एका निवडणुकीदरम्यान मी दिंडोशी-मालाडमध्ये होते. तेव्हा नोटांनी भरलेली बॅग पोलिसांनी पकडली होती. आमचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. ती बॅग घेऊन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आले होते. पण तेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला की, ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. तेव्हा मला कळालं की हे मोहित कंबोज आहेत आणि ते भाजपचे नेते आहेत. फडणवीसांकडे गृहखातं असल्यामुळे ते वाचले”, असा किस्सा विद्या चव्हाण यांनी सांगितला.

“मोहित कंबोज म्हणजे ठग आहे. भाजपचा मनी सप्लायर आहे. त्याने मला जय श्रीराम केलंय. तर मी ही त्याला उत्तर दिलंय. हर हर महादेव, जय जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नली, जय सियाराम! आम्ही रामाच्या आधी सितामय्याचं नाव घेतो. कारण आम्ही सच्चे हिंदु आहोत. आमचं हिंदुत्व ढोंगी नाही. त्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे” , असं म्हणत विद्या चव्हाण यांनी मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर दिलंय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.