शरद पवारांसोबत दिग्गजांची बैठक, राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग

| Updated on: Aug 14, 2020 | 3:42 PM

राष्ट्रवादी काँग्रेसची वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महत्त्वपूर्ण बैठर पार पडली (NCP Leaders Meeting With Sharad Pawar).

शरद पवारांसोबत दिग्गजांची बैठक, राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महत्त्वपूर्ण बैठर पार पडली (NCP Leaders Meeting With Sharad Pawar). या बैठकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासह आणखी काही ज्येष्ठ नेते उपस्थित होते. ही बैठक संपल्यानंतर सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे वाय. बी. चव्हाण सेंटरमधून बाहेर पडले.

या बैठकीनंतर सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. “सामाजिक विभागासंदर्भात बैठक होती. सर्व मंत्र्यांची आपापल्या विभागाची कामे सुरु आहेत”, असं सांगून धनंजय मुंडे निघून गेले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर कुणीही प्रतिक्रिया दिली नाही (NCP Leaders Meeting With Sharad Pawar).

हेही वाचा : शरद पवार बोलले पार्थला, शब्द बोचले अजित पवारांना, आता पार्थ अन्य सदस्यांशी चर्चा करणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबात एक नवा वाद उफाळून आला आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व म्हटलं होतं. तसेच, आम्ही पार्थच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देत नाही, असंही शरद पवार म्हणाले होते. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत अनेक राजकीय घडामोडींना वेग आला.

पार्थ पवार हे मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पवार कुटुंबात वाद उद्भवल्याची चर्चा होताच खासदार सुप्रिया सुळे यांनी काल (13 ऑगस्ट) मध्यस्थिची भूमिका घेत पार्थ पवारांना थेट शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर बोलावून घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

अजित पवारही नाराज?

दरम्यान, शरद पवार यांनी पार्थ पवार यांना अपरिपक्व म्हटल्यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. कॅबिनेट बैठकीतूनही ते लवकर निघाले होते. त्यानंतर पवार कुटुंबियांची सिल्व्हर ओक इथे बैठक झाली होती. आजोबांनी नातवाला सुनावलं तरी त्यात गैर काय अशी सारवा सारव राष्ट्रवादीचे नेते करत असले, तरी एक पिता म्हणून अजित पवारांना शरद पवारांचे पार्थला बोललेले शब्द लागल्याचं सांगण्यात येत आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले होते.

संबंधित बातम्या :

Parth Pawar | पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात पवारांच्या घरातून? 

Pawar vs Pawar | वेगळा झेंडा ते फडणवीसांसोबत शपथ, पवार कुटुंबातील मतांतरे दर्शवणाऱ्या चार घटना