राष्ट्रवादीचे नेते रायगडावर गेले, पण शिवरायांच्या समाधीचं दर्शन न घेताच परतले!
रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला गुरुवारपासून रायगडाहून सुरुवात झाली. या माध्यमातून राज्य पिंजून काढलं जाणार आहे. पण रायगडाहून यात्रेची सुरुवात करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचाच विसर पडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रायगडावर मेघडबंरी म्हणजे राज्याभिषेक सोहळ्याचा पुतळा आणि होळीच्या माळावरील पुतळ्यांचं दर्शन घेतलं. पण गडावरील जगदिश्वर मंदिरासह शिवरायांच्या समाधीकडे न […]
रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला गुरुवारपासून रायगडाहून सुरुवात झाली. या माध्यमातून राज्य पिंजून काढलं जाणार आहे. पण रायगडाहून यात्रेची सुरुवात करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचाच विसर पडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रायगडावर मेघडबंरी म्हणजे राज्याभिषेक सोहळ्याचा पुतळा आणि होळीच्या माळावरील पुतळ्यांचं दर्शन घेतलं. पण गडावरील जगदिश्वर मंदिरासह शिवरायांच्या समाधीकडे न जाताच सर्व नेते गडावरुन आले खाली.
गडावर जाऊनही राष्ट्रवादीचे नेते शिवरायांच्या समाधीचं दर्शन न घेताच माघारी परतल्याने शिवप्रेमींनी याबद्दल संताप व्यक्त केलाय. सध्या सर्वच राजकीय पक्ष थोर पुरुषांचा आधार घेऊन जनतेच्या आस्थेला हात घालण्याचा प्रयत्न करतात. परंतु या सर्व धावपळीत मात्र मोठी चूक करुन बसतात आणि त्याचे पडसाद मात्र तीव्र दिसतात. अशीच नाराजी आता राष्ट्रवादी काँग्रेसने ओढून घेतली आहे.
रायगडावरील कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, जयंत पाटील, गणेश नाईक, धनजंय मुंडे, अनिल देशमुख, नवाब मलिक, फौजिया खान, विद्या चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अदिती तटकरे यांच्यासह अनेक प्रदेश पातळीचे नेते रायगड किल्ल्यावर उपस्थित होते.
साधारण सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान सर्व नेते रायगडावर आले. अगोदर मेघडबंरीतील महाराजाच्या पुतळ्याचं दर्शन केलं. त्यानंतर होळीचा माळ येथील पुतळ्याचे सर्वांनी दर्शन केले, घोषणाबाजी झाली आणि त्यानतंर गडावरील जगदिश्वेर मंदिराकडील समाधीकडे न जाता सर्व नेत्यांनी पुन्हा राजदरबाराकडे येऊन गडावरुन रोपवेच्या सहाय्याने पायउतार झाले आणि पुढील कार्यक्रमाला निघून गेले.
या सर्व प्रकारामुळे तिथे उपस्थित असलेल्या शिवप्रेमींनी नाराजी तर व्यक्त केलीच, शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन हा फक्त दिखाऊपणा होता का, असा संतप्त सवालही उपस्थित केला.