आघाडीच्या घोषणेपूर्वीच राष्ट्रवादीने राजू शेट्टींना जागा सोडली!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणूक 2019 साठी आपली पहिली उमेदवार यादी आज जाहीर केली. पहिल्या यादीत 12 जागांबाबत घोषणा केली. यामध्ये राज्यातील 11 जागा आहेत तर एक लक्षद्विपची आहे. राज्यातील 11 पैकी 10 जागी उमेदवार दिले आहेत, तर 1 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली उमेदवार यादी जाहीर […]

आघाडीच्या घोषणेपूर्वीच राष्ट्रवादीने राजू शेट्टींना जागा सोडली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणूक 2019 साठी आपली पहिली उमेदवार यादी आज जाहीर केली. पहिल्या यादीत 12 जागांबाबत घोषणा केली. यामध्ये राज्यातील 11 जागा आहेत तर एक लक्षद्विपची आहे. राज्यातील 11 पैकी 10 जागी उमेदवार दिले आहेत, तर 1 जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली उमेदवार यादी जाहीर केली.

राजू शेट्टींसाठी जागा सोडली राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या वाट्याची हातकणंगले मतदारसंघाची जागा खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचा स्वाभिमानीला पाठिंबा आहे. अद्याप राजू शेट्टींसोबत काँग्रेस- राष्ट्रवादीची जागावाटपावरुन चर्चा सुरु आहे. तरीही राष्ट्रवादीने आपली पहिली यादी जाहीर करताना, राजू शेट्टींसाठी जागा सोडली. राजू शेट्टी हातकणंगलेसह सांगली आणि वर्ध्याच्या जागेसाठी आग्रही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राजू शेट्टींशी चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र राजू शेट्टींची अधिकृत भूमिका अद्याप कळलेली नाही.

गेल्या 2014 च्या निवडणुकीत राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना-भाजपच्या महायुतीसोबत होती. त्यावेळी राजू शेट्टींविरोधात काँग्रेसने कल्लाप्पा आवाडे यांना तिकीट दिलं होतं. राजू शेट्टींना त्यांचा पराभव केला होता.

जयंत पाटील काय म्हणाले?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची जागा राजू शेट्टींसाठी सोडली आहे. तिथे राष्ट्रवादीचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा असेल”

NCP यादी रायगड-सुनिल तटकरे, बारामती-सुप्रिया सुळे, सातारा- उदयनराजे भोसले, कोल्हापूर- धनंजय महाडिक बुलडाणा-राजेंद्र शिंगणे जळगाव- गुलाबराव देवकर परभणी- राजेंद्र विटेकर मुंबई उत्तर पूर्व -संजय दिना पाटील ठाणे-आनंद परांजपे कल्याण -बाबाजी पाटील हातकणंगले- स्वाभिमानीला पाठिंबा

लक्षद्विप – फैजल मोहम्मद

संबंधित बातम्या 

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.