उदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी?

भाजप अध्यक्ष अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) भाजपमध्ये डेरेदाखल झाले.

उदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी?
Follow us
| Updated on: Sep 14, 2019 | 3:12 PM

Prithviraj Chavan vs Udayanraje Bhosale नवी दिल्ली :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) भाजपमध्ये डेरेदाखल झाले.

उदयनराजे विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण?

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होण्याची चिन्हं आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेली लोकसभेची ही जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan vs Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली आहेत. काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव पुढे करण्यात आलं  आहे.

राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राचा विचार केला, तर पहिल्यापासून सातारा जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी राहिली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड राहिली. गेल्या 2 टर्म छत्रपती उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाही त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला. मात्र तीनच महिन्यात त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता.  उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा त्यांची आघाडी निम्म्याने घटली. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंना 1,26,528 मतांनी विजय मिळवता आला.

या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं होतं. यावेळी या मतदारसंघात 60.33 टक्के मतदानाची नोंद झाली होती. 2014 च्या तुलनेत यावेळी 3.33 टक्क्यांनी मतदान वाढले. या मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले आणि भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली.

उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale BJP) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप अध्यक्ष अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले भाजपमध्ये डेरेदाखल झाले. रात्री उशिरा दिल्लीत दाखल झालेल्या (Udayanraje Bhosale BJP) राजेंनी रात्री सव्वा वाजता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उदयनराजेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.