महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भय्ये” माफी मागणार का? : जितेंद्र आव्हाड

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी एम्सच्या विशेष पथकाने सुशांतने आत्महत्याच केली असून, त्याच्या हत्येची शक्यता फेटाळून लावली.

महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे मराठी भय्ये माफी मागणार का? : जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 2:29 PM

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भय्ये” माफी मागणार का? असा सवाल राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विचारला आहे. (NCP Minister Jitendra Awhad slams Critics of Maharashtra Police calling them Marathi Bhaiyye)

‘सुशांत प्रकरणात काही न्यूज चॅनेल्स, मराठी भैय्ये आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांची नाहक बदनामी केली. आता सीबीआयने मान्य केलं आहे की, सुशांतने आत्महत्याच केली. महाराष्ट्र आणि महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करणारे “मराठी भैय्ये” आता माफी मागणार का?’ असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर विचारला आहे. “मराठी भय्ये” म्हणणाऱ्या आव्हाडांचा रोख नेमका कोणाकडे आहे, याविषयी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी एम्सच्या (AIIMS) विशेष पथकाने आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला. या अहवालात त्यांनी सुशांतने आत्महत्याच केली असून, त्याच्या हत्येची शक्यता फेटाळून लावली. याआधीही एम्सच्या विशेष पथकाने सुशांतवर विषप्रयोग झाल्याचा दावा फेटाळून लावला होता. या प्रकरणी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, ‘सीबीआयने लवकरात लवकर अहवाल सादर करावा, जेणेकरुन सत्य लोकांसमोर येईल’, अशी मागणी केली.

सुशांतच्या कुटुंबासोबतच त्याच्या चाहत्यांनीही हत्येचा संशय व्यक्त करत न्यायासाठी सोशल मीडियावर अनेक मोहिमा राबवल्या होत्या. यानंतर सुशांत आत्महत्या प्रकरण, हत्येच्या संशयामुळे सीबीआयकडे सोपवण्यात आले.

संबंधित बातम्या :

सुशांतची हत्या नव्हे आत्महत्याच!, एम्सच्या विशेष पथकाचा दावा

सुशांतचा सीबीआय अहवाल लवकरात लवकर यावा; जनतेला सत्य समजलंच पाहिजे : अनिल देशमुख

कधी झाला सुशांतचा मृत्यू आणि केव्हा केलं पोस्टमार्टम? रिपोर्टमधून सत्य समोर

(NCP Minister Jitendra Awhad slams Critics of Maharashtra Police calling them Marathi Bhaiyye)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.