अमोल मिटकरींना कोरोना लसीवर शंका, मोदींनी मीडियासमोर कोरोना लस घ्यावी, मिटकरींचे आवाहन

पंतप्रधान मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन मिटकरी यांनी केले. (Amol Mitkari Doubt About Corona Vaccine)

अमोल मिटकरींना कोरोना लसीवर शंका, मोदींनी मीडियासमोर कोरोना लस घ्यावी, मिटकरींचे आवाहन
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 6:22 PM

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी कोरोना लसीवर शंका उपस्थित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन अमोल मिटकरी यांनी केले आहे. (Amol Mitkari Doubt About Corona Vaccine)

देशाचे पंतप्रधान मोदी यांच्यावर भारतीय जनता पार्टीचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी आधी मीडियासमोर येऊन लस टोचून घ्यावी. म्हणजे आमचाही त्यावर विश्वास बसेल. मोदी सुरक्षित तर देश सुरक्षित असेल. म्हणून आधी मोदींनी मीडियासमोर लस टोचून घ्यावी, असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केलं.

दरम्यान येत्या 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरण केले जाणार आहे. केंद्राकडून भारत आणि सीरमच्या या दोन कंपनींच्या कोरोना लसींना परवानगी देण्यात आली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

महाराष्ट्रात कोव्हीशिल्ड व्हॅक्सीनचे 9.63 लाख डोसेस व कोव्हॅक्सिन लसीचे 20,000 डोसेस प्राप्त झाले आहेत. ते सर्व जिल्हयांपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत. भारत बायोटेककडून प्राप्त झालेली कोव्हॅक्सीन लस ही राज्यातील 6 ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालये व 2 जिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय आणि खाजगी डॉक्टर्स, नर्सेस, इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाईल.

केंद्र शासनाकडून लसीचा पुरवठा सुरु झाला आहे. सध्या पुरवठा करण्यात आलेल्या डोसेस नुसार 285 ठिकाणी व्हॅक्सिनेशन सेशन्स आयोजित करण्यात येत आहेत. प्रत्येक लाभार्थीला लसीचे 2 डोस 4 ते 6 आठवडयाच्या अंतराने देण्यात येणार आहे. (Amol Mitkari Doubt About Corona Vaccine)

संबंधित बातम्या :

ED नोटीसनंतर वर्षा राऊतांकडून 55 लाख परत, आता पुन्हा ईडी नोटीस पाठवण्याच्या तयारीत

मुंबई मेट्रो लाईन-7ला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या; रवींद्र वायकर मुख्यमंत्र्यांना भेटले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.