धनंजय मुंडेंची प्रकृती उत्तम, अफवांवर विश्वास ठेवू नका
धनंजय मुंडे यांच्या पोटात बुधवारी रात्री अचानक दुखू लागल्यामुळे ते चर्चगेटमधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Dhananjay Munde Health Update) गेले होते.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपली प्रकृती उत्तम असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन समर्थकांना केलं आहे. बुधवारी रात्री अचानक पोटात दुखू लागल्यामुळे ते चर्चगेटमधील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये (Dhananjay Munde Health Update) गेले होते.
धनंजय मुंडेंच्या काही प्राथमिक तपासण्या रात्री उशिरा करण्यात आल्या. धनंजय मुंडे यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीविषयी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि समर्थक चिंता व्यक्त करत होते. सोशल मीडियावर चर्चांना उधाण आल्यामुळे मुंडे यांच्या ऑफिसतर्फे ट्वीट करुन त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देण्यात आली. धनंजय मुंडे यांनीही रिट्वीट करत त्यावर शिक्कामोर्तब केलं. काळजीचं कारण नसल्याचं ट्विटरवर स्पष्ट झाल्याने कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.
‘पोटदुखी च्या त्रासाने तपासणीसाठी आ.धनंजय मुंडे साहेब मुंबई इस्पितळात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद’ असं ट्वीट धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
पोटदुखी च्या त्रासाने तपासणीसाठी आ.धनंजय मुंडे साहेब मुंबई इस्पितळात गेले होते. त्यांची तब्येत उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नाही. सर्वांना विनंती आहे की, आपण कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. सर्वांच्या सदिच्छेबद्दल धन्यवाद ?
— OfficeofDM (@OfficeofDM2) October 30, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेते म्हणून अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित होते. त्यानंतर घरी परतल्यावर अचानक त्यांच्या पोटात दुखू (Dhananjay Munde Health Update) लागलं होतं.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीडमधील परळी मतदारसंघातून धंनजय मुंडे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी बहीण आणि भाजप मंत्री पंकजा मुंडे यांना हरवून गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला.