चंद्रकांतदादांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख, निलेश लंके भडकले, म्हणाले, सत्तेचा माज आलाय काय?
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा निषेध करत बोलताना जरा भान बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
अहमदनगर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्याने राष्ट्रवादीचे नेते कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा निषेध करत बोलताना जरा भान बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
शरद पवार प्रत्येक संकटसमयी धावून गेले
शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ आणि आदरणीय नेते आहेत. देशावर आणि राज्यावर आलेल्या प्रत्येक संकटसमयी शरद पवार धावून गेले आहेत. मग गुजरातमधील भूकंप असो, किल्लारीचा भूकंप असो, कोल्हपूर सांगलीला आलेला महापूर असो… प्रत्येकवेळी शरद पवार मदतीसाठी पुढे गेले.
देशाचं राजकारण त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही, सांभाळून बोला
देशाच्या राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, देशाचं राजकारण नेहमी त्यांच्याभोवती फिरत राहतं. मग अशा नेत्याविषयी बोलताना जरासं भान बाळगावं, असा सल्ला निलेश लंके यांंनी चंद्रकांतदादांनी दिला. तसंच चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत यापुढे सांभाळून बोलण्याचा सल्ला दिलाय.
चहुकडून टीकेची झोड, चंद्रकांत बॅकफूटवर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा थेट एकेरी उल्लेख केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केलं होतं. टीकेची झोड उठल्यानंतर आता चंद्रकांत पाटील बॅकफूटवर आले आहेत.
पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या, त्यातल्या 38 पूर्ण केल्या
“पवार साहेब विरोधक जरी असले तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनात अनादर नाही. आमचा काही एकमेकांच्या बांधाला बांध नाही. उलट प्रमोद महाजन आम्हाला सांगायचे. मुख्यमंत्री होताना पवार साहेबांनी 40 गोष्टी लिहून काढल्या. त्यातल्या 38 पूर्ण केल्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
माझ्या मनात पवार साहेबांबद्दल आदरच आहे
तसेच पुढे बोलताना “मी अनावधानाने जो उल्लेख झालेला आहे, त्याबद्दल काही लोक बोलत आहेत. हे राष्ट्रवादीच्या पे रोलवर आहेत. त्यांना ते म्हणावंच लागतं. माझ्या मनात पवार साहेबांबद्दल आदरच आहे. अश्या प्रकारे आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ माणसाचा अनादर करणं आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, हिंदू संस्कृतीने शिकवलेले नाही,” असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
(NCP MLA Nilesh Lanke Attacked Chandrakant patil Over Criticism Sharad Pawar)
वाहतुकदारांच्या समस्यांवर तोडगा काढणार, प्रत्येक शहरांत वाहनतळ, चेक पोस्ट नजीक ट्रॉमा केअर सेंटर्स उभारणार : मुख्यमंत्रीhttps://t.co/YT0EZdKFEd@OfficeofUT @PawarSpeaks @Dwalsepatil
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 18, 2021
हे ही वाचा :
पवारांच्या एकेरी उल्लेखावर भडका, आता पाटील म्हणतात, पवारांनी 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या !