APMC Election 2023 | प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या राहुरीत सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का, प्राजक्त तनपुरे यांचीच बाजी

राहुरी बाजार समितीत आमदार प्राजक्त तनपुरेच 'दादा' ठरल्याचं सिद्ध झालं आहे. प्राजक्त तनपुरे यांनी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना चांगलाच शह दिला आहे. त्यामुळे आता राहुरी बाजार समितीत पुन्हा तनपूरेंचीच सत्ता आली आहे.

APMC Election 2023 | प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या राहुरीत सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का, प्राजक्त तनपुरे यांचीच बाजी
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 10:10 PM

अहमदनगर : महाराष्ट्रातील 147 कृषी उत्पन्न बाजार समितींसाठी आज निवडणूक पार पडली. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी पार पडत आहेत. यापैकी काही बाजार समित्यांचे निकाल आता समोर येताना दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी कृषी उत्पन्ना बाजार समितीचा निकाल जाहीर झालाय. या निवडणुकीत भाजप खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार प्राजक्त तनपुरे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. अखेर या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे.

राहुरी बाजार समितीत आमदार प्राजक्त तनपुरेच ‘दादा’ ठरल्याचं सिद्ध झालं आहे. प्राजक्त तनपुरे यांनी खासदार सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना चांगलाच शह दिला आहे. त्यामुळे आता राहुरी बाजार समितीत पुन्हा तनपूरेंचीच सत्ता आली आहे. या निवडणुकीत तनपूरे गटाचा दणदणीत विजय झालाय. तनपूर गटाने 18 पैकी तब्बल 16 जागा जिंकत विजय संपादीक केलाय.

या निवडणुकीत चांगली राजकीय रणधुमाळी रंगताना बघायला मिळाली. पण तनपूरे यांनी विखे आणि कर्डिले गटाचा पराभव केला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत विखे पाटलांनी तनपूरेंना आव्हान दिलं होतं. पण आता तनपूरे गटाने विखे-कर्डिले गटाचा पराभव केलाय. राहुरी बाजार समितीवर 20 वर्षांपासून तनपूरे गटाची एकहाती सत्त आहे. तर विखे-कर्डिले गटाचे सोसायटी मतदारसंघातून दोन सदस्य निवडून आले आहेत.

हे सुद्धा वाचा

अमरावतीत काँग्रेसची बाजी

अमरावतीत तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी आज मतदान पार पडलं. मतदानानंतर लगेच मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. या मतमोजणीतून महत्त्वाचा निकाल समोर आला. तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व 18 जागा आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. यशोमती ठाकूर यांच्या गटाने या बाजार समितीत मुसंडी मारली आहे. तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहारचा धुव्वा उडला आहे. या निकालानंतर तिवसामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जल्लोष केला जातोय.

कोणत्या बाजार समितीत कोणाची बाजू?

1) दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मविआची बाजी

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. मविआ नेते संजय देशमुख, माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महाविकास आघाडीला 18 पैकी 14 जागी विजयी मिळाला आहे. या निवडणुकीत फक्त 4 जागी संजय राठोड गटाचे संचालक निवडून आले आहेत. हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांचा मोठा विजय मानला जातोय.

2) यवतमाळ बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीची बाजी

यवतमाळ बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीला 11 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीने गड राखण्यात यश मिळवलं आहे. तर भाजपला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे भाजपला पहिल्यांदाच बाजार समितीत 4 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली मविआला इथे विजय मिळाला आहे.

3) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव बाजार समिती भाजपच्या ताब्यात

महागाव बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या नाईक परिवाराची सत्ता भाजपने उलथवली आहे. त्यामुळे आता भाजप-शिंदे गटाच्या युतीकडे बाजार समिती गेली आहे. महागावमध्ये भाजप 9 जागी, शिवसेना शिंदे गट 2 जागी तर काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा, असा निकाल समोर आला आहे. बाजार समितीत सत्तापालट करण्यात आमदार नामदेव ससाणेंना मोठं यश आलं आहे.

4) यवतमाळच्या बाभूळगाव बाजार समितीत युतीला झटका, मविआची बाजी

यवतमाळच्या बाभूळगाव बाजार समितीत भाजपचे आमदार अशोक उईके यांना धक्का बसला आहे. बाभूळगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीला 13 तर भाजप-शिंदे गटाला 4 जागांवर यश मिळालं आहे.

5) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा विजय

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय मिळाला आहे. महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व सात जागांवर विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीला दिंडोरीतून विजयी मिळण्यास सुरुवात झालीय. भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाला हे मोठं यश मिळाल्याचं मानलं जात आहे.

6) नाशिक जिल्ह्यातील देवळामध्ये शेतकरी विकास पॅनलची सरशी

देवळा बाजार समितीवर भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि राष्ट्रवादीचे योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलची सरशी बघायला मिळतेय. शेतकरी विकास पॅनलला सोसायटी आणि ग्रामपंचायत गटाच्या सर्व जागांवर विजय मिळाला आहे. यापूर्वी 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत 10 पैकी 7 जागांवर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.