Raju Karemore : ईडीची कारवाई केवळ महाराष्ट्रातच, राष्ट्रवादीच्या खच्चीकरणाचं काम सुरु; आमदार राजू कारेमोरे यांचा आरोप
ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील वरळी येथील सीजे हाऊसमधील घर जप्त केले आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्चीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे.
भंडारा – मागच्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात ईडीच्या (ED) कारवाई सुरु आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती कारवाई सुरु असल्याची ओरड सुरु आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं (MVA) सरकार असताना नवाब मलिक अनिल देखमुख यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य नेत्यांवरती कारवाई होणार असल्याचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. अनिल परब यांच्या मालमत्तेवरती राज्यात आयकर विभाग आणि ईडीकडून छापेमारी झाली होती. संजय राऊत यांना सुध्दा ईडीच्या कार्यालयात एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. सध्या ईडीची कारवाई केवळ महाराष्ट्रातच सुरू आहे. राष्ट्रवादीच्या खच्चीकरनाचे काम ईडी करत आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केली आहे असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) यांनी केला आहे.
राष्ट्रवादीच्या खच्चीकरणाचं काम सुरु
ईडीची कारवाई केवळ महाराष्ट्रातच होत असून ईडीद्वारे हे सर्व राष्ट्रवादीच्या खच्चीकरणाचे काम सुरु आहे. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारमोरे यांनी भाजपवरती आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यावर झालेल्या ईड़ी कारवाई बाबत ते बोलत होते.प्रफु्ल्ल पटेल हे देशाचे नेते आहेत. त्याचबरोबर सकारात्मक दृष्टीकोण ठेवणारे नेते आहेत.येणारा काळ सर्व उलगड़ा करतोय. मात्र ज्या नेत्यांवर सध्या कारवाई होत आहे, त्यांना त्रास होत आहे असं देखील वक्तव्य आमदार राजू कारमोरे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे यांच्यापूर्वी देखील राजू कारमोरे यांची देखील ईडीने चोकशी केली आहे.
मुंबईतील वरळी येथील सीजे हाऊसमधील घर जप्त
ईडीने प्रफुल्ल पटेल यांचे मुंबईतील वरळी येथील सीजे हाऊसमधील घर जप्त केले आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी इक्बाल मिर्चीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हे ईडीच्या परवानगीशिवाय हे घर विकू शकणार नाहीत. प्रफुल्ल पटेल यांची यापूर्वी दोनदा ईडीने चौकशी केली होती आणि आता त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.