तुरुंगातील रमेश कदमांना भरारी पथकाने ठाण्यातील फ्लॅटमध्ये पकडले, 54 लाख सापडले!
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम (Election Commission raid on MLA Ramesh Kadam), यांना ठाण्यातील एका घरातून जवळपास 60 लाखांच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आलं आहे.
ठाणे : अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम (Election Commission raid on MLA Ramesh Kadam), यांना ठाण्यातील एका घरातून जवळपास 60 लाखांच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आलं आहे. रमेश कदम (Election Commission raid on MLA Ramesh Kadam) यांना वैद्यकीय तपासणीसाठी तुरुंगातून मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर ठाण्यातील एका मित्राकडून एक महत्वाचे पार्सल घ्यायचे असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यावेळी पोलिसांसोबत घोडबंदरला गेलेल्या रमेश कदम यांना पोलीस आणि निवडणूक भरारी पथकाने मोठ्या रकमेसह ताब्यात घेतलं. शुक्रवारी दुपारी हा सर्व थरार रंगला.
रमेश कदम यांच्याकडून ठाणे गुन्हे शाखा युनिट 1, कासारवडवली पोलीस आणि निवडणूक भरारी पथक यांनी संयुक्तरित्या केलेल्या कारवाईमध्ये 53 लाख 46 हजारांची हस्तगत केली.
Thane: Police & Election Commission seized Rs 53,46,000 during a raid at a flat in Ghodbunder, yesterday. Ramesh Kadam,sitting NCP MLA,who is seeking re-election from Mohol as an independent candidate&Raju Khare,owner of the flat have been arrested. #MaharashtraAssemblyPolls
— ANI (@ANI) October 18, 2019
रमेश कदम यांच्यावर अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ते सध्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहेत. शुक्रवारी 18 ऑक्टोबरला त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.
मात्र त्यानंतर त्यांनी पोलिसांना सांगून एक पार्सल घेण्यासाठी घोडबंदरला नेण्याची विनंती केली. पोलिसांनी ती विनंती मान्य करत, त्यांना खासगी कारने घोडबंदर रोड, ओवळा येथील पुष्पांजली रेसिडेंन्सी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील राजू खरे यांच्या खोलीत नेले.
तिथून ते हे पार्सल घेऊन निघण्याच्या तयारी असतानाच ठाणे गुन्हे शाखा युनिट एकचे पथक आणि कासारवडवली पोलिस निवडणुकीत भरारी पथकासह पुष्पांजली रेसिडेंन्सी इमारतीत पोहचले. त्यावेळी कदम आणि खरे यांना 53 लाख 46 हजारांच्या रोकडसहित रंगेहाथ पकडले.
दुसरीकडे वैदयकीय तपासणीनंतर पोलिस एस्कॉर्ट पथकाचे प्रभारी पोलिस उप निरीक्षक हे त्यास ठाणे मध्यवर्ती कारागृहात घेऊन न जाता मुंबई येथून एका खाजगी कार मधून घोडबंदर रोड ठाणे येथील खाजगी फ्लॅटमध्ये घेऊन गेले होते. त्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.