राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम शिवसेनेच्या वाटेवर!

अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम शिवसेनेत जाणार आहेत. जालना जिल्हा न्यायालयात सुनावणी दरम्यान रमेश कदम आले असता त्यांनी स्वतः याची माहिती दिली. अण्णाभाऊ साठे आर्थिक गैरव्यवहारात रमेश कदम 4 वर्षांपासून तुरुंगात आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम शिवसेनेच्या वाटेवर!
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 4:26 PM

जालना : अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम शिवसेनेत जाणार आहेत. जालना जिल्हा न्यायालयात सुनावणी दरम्यान रमेश कदम आले असता त्यांनी स्वतः याची माहिती दिली. अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक गैरव्यवहारात रमेश कदम 4 वर्षांपासून तुरुंगात आहेत.

रमेश कदम मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा विकास झालेला नाही. सत्तेसोबत राहिल्याशिवाय विकास शक्य नाही. म्हणून मी लवकरच सत्ताधारी पक्षात दिसेल, असं मत रमेश कदम यांनी व्यक्त केलं.

कदम म्हणाले, “मोहळ विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. त्याच्या विकासासाठी काही तरी ठोस भूमिका घ्यावी लागले. ही भूमिका घेताना सत्तासोबत राहिल्याशिवाय विकास होत नाही, हेही लक्षात घ्यावे लागले. मी पहिल्यांदाच आमदार झालो आहे. मात्र, माझ्यापेक्षा जास्त काळ आमदार राहिलेले, 4-5 वेळा आमदार, मंत्री, पालकमंत्री राहिलेले नेते देखील हीच भूमिका घेत आहेत. त्यांनी विकासासाठी सत्तेची साथ दिली आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात मोहळ विधानसभेचा आमदार म्हणून मीही सत्तेसोबत राहून मोहळमध्ये विकासासाठी प्रयत्न करेल.”

शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये जाणार या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. त्यावर सत्तेसोबत जाणार इतकंच ते म्हणाले. अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात मला बळीचा बकरा करण्यात आलं. त्यामुळे ज्या लोकांनी हे केलं ते लवकरच समोर येईल. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यात सर्व गोष्टींची शहानिशा होईल, तपासणी होईल. त्यातून खरी वस्तूस्थिती जनतेच्या समोर येईल आणि मला न्याय मिळेल, असंही कदम म्हणाले.

रमेश कदम म्हणाले, “मागील 4 वर्षांपासून तुरुंगात असल्याने मोहळच्या विकासाला खिळ बसली आहे. त्यामुळे या विकासाला आता चालना द्यावी लागणार आहे. मी अडचणीत असलेला लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मला मदतीसाठी नवे मार्ग शोधावे लागतील.”

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.