राष्ट्रवादीच्या आमदारांची ‘घरवापसी’, संख्याबळ किती?

जळगावमधील अंमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी फेसबुकवरुन आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याच्या भावना व्यक्त केल्या

राष्ट्रवादीच्या आमदारांची 'घरवापसी', संख्याबळ किती?
Follow us
| Updated on: Nov 24, 2019 | 6:32 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार एकामागून एक परतीच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. जळगावमधील अंमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी फेसबुकवरुन आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याच्या भावना (NCP MLA Returns) व्यक्त केल्यानंतर अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनीही आपण पवारांसोबत असल्याचं स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करुन याविषयी माहिती दिली आहे.

अजित पवारांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी करुन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने राष्ट्रवादीत फूट पडल्याचं चित्र होतं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी 50 आमदार आपल्यासोबत असल्याची माहिती दिली.

अनिल भाईदास पाटील यांची फेसबुक पोस्ट

‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच आहे, माझा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, मा.अजितदादा पवार हे गटनेते असल्याने त्यांच्या सांगण्यावरून मी इतर आमदारांसोबत राजभवनात गेलो होतो तिथे काय होणार आहे या बाबत कोणतीही कल्पना नव्हती, मी पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात नाही ! कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये !’ असं आवाहन अनिल पाटील यांनी फेसबुकवरुन केलं आहे.

‘मी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोबतच आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोबत आहे मी पूर्वीही ही पक्षाच्या सोबत होतो आणि आता पण पक्षाचा सोबतच आहे.’ असं बाबासाहेब पाटील यांनी फेसबुकवर लिहिलं आहे.

सिल्व्हर ओकमध्ये गजबज

भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’मध्ये सकाळीच दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे काकडे नेमका कोणता निरोप घेऊन पवारांकडे आले, याची उत्सुकता लागली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ हेसुद्धा शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले असून सध्या आपल्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या 50 असल्याचं त्यांनी सांगितलं.

आमदार संपर्काबाहेर

राष्ट्रवादीचे अनेक आमदार अद्यापही संपर्कात नसल्याने शरद पवारांच्या काळजीत भर पडली आहे. सर्व आमदारांशी संपर्क साधण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आता आमदारांच्या कुटुंबीयांकडूनच थेट तक्रार दाखल होऊ लागल्याने आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत आहे.

नाशिकमधील कळवणचे आमदार नितीन पवार शनिवारी (23 नोव्हेंबर) पक्षाच्या बैठकीला जात असल्याचे सांगून गेले ते परत आलेच नाही. तसेच त्यांच्याशी घरच्यांचाही संपर्क होत नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने पंचवटी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

आधी आऊट ऑफ नेटवर्क, नंतर संपर्क

नितीन पवार – कळवण (नाशिक) – संपर्कात असल्याची माहिती दौलत दरोडा – शहापूर (ठाणे) – फेसबुक पोस्टमधून सोबत असल्याची माहिती माणिकराव कोकाटे – सिन्नर (नाशिक) संपर्कात असल्याची माहिती बाबासाहेब पाटील – अहमदपूर (लातूर) – फेसबुक पोस्टमधून सोबत असल्याची माहिती अनिल पाटील – अमळनेर (जळगाव) – फेसबुक पोस्टमधून सोबत असल्याची माहिती नरहरी झिरवाळ – दिंडोरी (नाशिक) – संपर्कात आहेत, दिल्लीत पोहचल्याची माहिती दिलीप बनकर – निफाड (नाशिक) – ट्वीट करुन सोबत असल्याची माहिती

सत्तेच्या अग्निपथावर पुढे काय?

शनिवारी (23 नोव्हेंबर) अचानक झालेल्या या सत्तानाट्याच्या वैधतेला दोन पातळीवर आव्हान असणार आहे. एक आव्हान विधीमंडळाच्या पटलावर बहुमत सिद्ध करण्याचे आहे. तर दुसरे आव्हान थेट सर्वोच्च न्यायालयात मिळणार आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या निर्णयाला आणि भाजपच्या सत्तास्थापनेच्या वैधतेला आव्हान दिले आहे. याची सुनावणी आज (24 नोव्हेंबर) सकाळी 11.30 वाजता होणार आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे हे बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून जोरदार फोडाफोडीचे प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून भाजपला बहुमत चाचणीत पराभूत करु, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. यापुढील काळात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून साम, दाम, दंड, भेद यांचा उपयोग करुन आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप (NCP MLA Returns) केला जात आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.