असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल, रोहित पवारांचे सूचक वक्तव्य

त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा," असेही रोहित पवार म्हणाले. (MLA Rohit Pawar on Joe biden New President of America)

असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल, रोहित पवारांचे सूचक वक्तव्य
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 12:17 PM

मुंबई : तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी बाजी मारली आहे. यानंतर जगभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी जो बायडन यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. “अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय आहे. अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे,” असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे. हे ट्विट करताना त्यांनी बिहार निवडणुकांवरुन भाजपलाही टोला लगावला आहे. (MLA Rohit Pawar on Joe biden New President of America)

“अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,” असे ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. तसेच “असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे,” असेही लिहित त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.

“बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतं. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा,” असेही रोहित पवार म्हणाले.

जो बायडन यांच्या ‘सातारा स्टाईल’ भाषणावर रोहित पवारांचं वक्तव्य

दरम्यान जो बायडेन यांचे फ्लोरिडातील भाषणावरही रोहित पवारांनी ट्वीट केले होते. फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. यामुळे अनेकांना शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण झाली. त्यावेळी रोहित पवारांनी जो बायडन यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या होत्या.

“जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे,” असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. (MLA Rohit Pawar on Joe biden New President of America)

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही घडेल; जो बायडन यांच्या ‘सातारा स्टाईल’ भाषणावर रोहित पवारांचं वक्तव्य

जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.