मुंबई : तब्बल तीन दिवस सुरु असलेल्या मतमोजणीनंतर अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी बाजी मारली आहे. यानंतर जगभरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी जो बायडन यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या. “अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय आहे. अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे,” असे ट्विट रोहित पवारांनी केले आहे. हे ट्विट करताना त्यांनी बिहार निवडणुकांवरुन भाजपलाही टोला लगावला आहे. (MLA Rohit Pawar on Joe biden New President of America)
“अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,” असे ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे. तसेच “असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे,” असेही लिहित त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
अमेरिकेतील हेकेखोर सरकारविरोधातील हा विजय असून अमेरिकन मतदारांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणलेला हा नवा बदल आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष @JoeBiden यांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे. https://t.co/2aguTOya2Q
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 7, 2020
“बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतं. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा,” असेही रोहित पवार म्हणाले.
बिहारमध्ये विरोधकांसाठी टाकलेल्या जाळ्यात भाजपप्रणित एनडीए स्वतःच गुरफटल्याचं एक्सिट पोलवरून दिसतंय. याचाच अर्थ सकारात्मक राजकारण सोडून दुसऱ्याला पाडण्यासाठी खड्डा खोदला तर त्यात आधी स्वतःचाच पाय अडकतो, याचा अनुभव भाजप घेतोय. त्यामुळं आता यातून तरी भाजपने काहीतरी बोध घ्यावा.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 8, 2020
दरम्यान जो बायडेन यांचे फ्लोरिडातील भाषणावरही रोहित पवारांनी ट्वीट केले होते. फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. यामुळे अनेकांना शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण झाली. त्यावेळी रोहित पवारांनी जो बायडन यांच्याप्रती भावना व्यक्त केल्या होत्या.
“जेव्हा सभेत जोरदार पाऊस येतो पण नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही तेव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि नव्याला न्हाऊ घालण्यासाठी आलेला असतो, असंच म्हणावं लागेल. २०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे,” असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. (MLA Rohit Pawar on Joe biden New President of America)
संबंधित बातम्या :
जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव; अमेरिकेत नव्या पर्वाला सुरुवात!