सकाळी 6 ते रात्री 11, अजितदादांच्या कामाचा धडाका, विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही, रोहित पवारांची स्तुतिसुमनं

राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाच्या स्टाईलचं पुन्हा कौतुक केलं आहे. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट करत आजचा अजितदादांसोबतचा आलेला अनुभव शेअर केला आहे.

सकाळी 6 ते रात्री 11, अजितदादांच्या कामाचा धडाका, विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही, रोहित पवारांची स्तुतिसुमनं
रोहित पवार आणि अजित पवार
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 12:09 PM

मुंबई :  राष्ट्रवादीचे युवा नेते, आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाच्या स्टाईलचं पुन्हा कौतुक केलं आहे. रोहित पवार यांनी एक फेसबुक पोस्ट करत आजचा अजितदादांसोबतचा आलेला अनुभव शेअर केला आहे. तसंच विकासाचं व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझं भाग्यच आहे, अशी कृतज्ञताही व्यक्त केलीय.

अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सोबतीला आज रोहित पवारही होते. अजितदादांच्या नियमानुसार आज सकाळीच म्हणजे सहाच्या ठोक्याला दादांनी काम सुरु केलं. दादांचं नेहमीच काम बघितलेल्या रोहित पवारांना आज पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकर्तृत्वाची भुरळ पडली.

विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही!

भल्या सकाळी पावणेसहा वाजल्यापासून रात्री अकरापर्यंत काम करणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक म्हणजे अजितदादा पवार… गेल्या तीस वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता कायम आहे. विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही, असं रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलंय.

आजही पहाटेच बारामतीत विविध कामांना भेट देऊन अजितदादांनी आढावा बैठक घेतली. विकास कामं करताना दादांचं त्यावर बारकाईने लक्ष असतं. आज मीही त्यांच्यासोबत उपस्थित होतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दादांसारख्या खऱ्या अर्थाने कार्यकुशल आणि विकासाचं व्हिजन असलेल्या नेत्याकडून धडे गिरवण्याची संधी मिळतेय, हेही माझं भाग्यच आहे, असंही रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.

अजित पवार यांचा बारामती दौरा, अधिकाऱ्यांना म्हणाले, ‘सकाळी पाचलाच येऊन बघतो’

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलं शिस्त आणि वेळेचा काटेकोरपणा या गोष्टी आल्याच. नियम न पाळल्यामुळे अजित पवार यांनी बड्या-बड्या अधिकाऱ्यांना फटकारल्याचे किस्से यापूर्वीदेखील चर्चेत आले आहेत. याची प्रचिती पुन्हा एकदा बारामतीमध्ये आली. मी वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल सूचना केल्या आहेत. त्याची नोंद संबंधित विभागाने घेतली असेल. आता मी त्यावर लक्ष ठेवेल. नाहीतर एखाद्या दिवशी पहाटे पाचलाच येऊन बघतो. काम सुरु आहे की नाही हे चेक करतो, असे म्हणत अजित पवार यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्याचे सूचित केले. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयात सीटी स्कॅन विभागाचे आज लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

रुग्णसेवेत कुठेही कुचराई होता कामा नये

पुढे बोलताना त्यांनी “कुणाचीही ऐपत नाही म्हणून उपचार घेता आले नाहीत, असं वाटू नये. यासाठी सर्व सुविधा बारामतीत उपलब्ध करायच्या आहेत. आरोग्य सेवेची कमतरता भासणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रुग्णसेवेत कुठेही कुचराई होता कामा नये वैद्यकीय व्यवसाय हा लोकांच्या जीवन मरणाशी संबंधित गरीब गरजू रुग्णांना मदत करा. गरीब गरजू रुग्णांना मदत करा, असेही अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा :

“सूचनांची नोंद घ्या, मी लक्ष ठेवेल, पहाटे पाचलाच येऊन बघतो,” बारामतीत अजितदादा पुन्हा एकदा ‘कर्तव्यकठोर’

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.