Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप

"अहमदनगरला भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत" असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap ) यांनी केला.

भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात : आमदार संग्राम जगताप
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 12:40 PM

अहमदनगर :अहमदनगरला भाजपचे आणखी काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून, ते देखील येत्या काळात आमच्यात येतील” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap ) यांनी केला. तर स्थायी समितीच्या सभापती संदर्भात वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असून त्यात कोणतीही अडचण राहिली नाही, असंही संग्राम जगताप यांनी सांगतिलं. (MLA Sangram Jagtap claim BJP corporators in touch with NCP)

महापौरपदाची निवडणूक येत्या काही महिन्यावर होत आहे. त्यामुळे नगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. तर येत्या काळात कोणते नवे राजकीय समीकरण पाहायला मिळेल याकडे नगरकरांचं लक्ष लागलं आहे.

नगरमध्ये सभापती निवडणुकीत राजकीय भूकंप पाहायला मिळाला होता. भाजपचा सभापतीपदाचा उमेदवारच राष्ट्रवादीत दाखल झाल्याने नगरमधील राजकीय वातावरण ढवळून निघालं.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे मनोज कोतकर (Manoj Kotkar) यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेचे योगीराज गाडे यांनी उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मागे घेतला. सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने माघार घेतल्याने कोतकर बिनविरोध निवडून आले.

अहमदनगरला स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मिळाल्यानं, मनोज कोतकर हे बिनविरोध सभापती झाले आहेत. तर सभापतीची निवडणूक होती यामध्ये मागच्या आठ दिवसांपूर्वी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली होती,असं जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी स्पष्ट केलं. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या उपस्थितीत एकत्र येऊन सर्वांनी निर्णय घेतला. त्यानुसार शिवसेनेने राष्ट्रवादीला स्थायी समिती पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं मंत्री गडाक यांनी सांगितलं.

वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे तीन पक्ष एकत्र आले आणि आता हळूहळू पक्षाचे कार्यकर्ते एकत्र येण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं गडाखांनी म्हटलंय.

पारनेरचा नाराजीनामा

दरम्यान, अहमदनगरच्या स्थानिक राजकारणातील खेळी नवीन नाही. पारनेरमधील पाच नगरसेवकांनी जुलै महिन्यात शिवसेना-राष्ट्रवादीत खळबळ उडवून दिली होती. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले होते, त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत या नगरसेवकांनी मातोश्रीवर पुन्हा ‘शिवबंधन’ हाती बांधले.

(MLA Sangram Jagtap claim BJP corporators in touch with NCP)

संबंधित बातम्या 

आमच्याशिवाय कुणालाच सरकार चालवता येणार नाही हा भाजपचा भ्रम संपला : शंकरराव गडाख   

शिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र   

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत 

ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य
'खरंच एकत्र यायचंय की..', ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधवांचं वक्तव्य.
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा
VIDEO: सातरच्या आजीचा नादखुळा.. 65व्या वर्षी फिरवतेय सुपरफास्ट रिक्षा.
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल
तुमची मुलगी द्या.., गावगुंडाकडून शिक्षकाला मारहाण, व्हिडीओ बघून हादराल.
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला.
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले.