Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अहमदनगर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अंतर्गत वाद मिटवून एकत्र आले. अहमदनगर पालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली

शिवसेनेने शब्द पाळला, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 1:27 PM

मुंबई : अहमदनगर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. भाजपमधून कालच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकर यांची स्थायीच्या सभापतीपदी वर्णी लागली. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. (NCP MLA Sangram Jagtap thanks CM Uddhav Thackeray for Supporting in Ahmednagar Standing Committees Chairman Election)

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री शंकरराव गडाख यांच्या चर्चेतून योग्य निर्णय झाला. चर्चेप्रमाणे राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांनी एकत्र बसून हा निर्णय घेतला आहे. अहमदनगरच्या राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून शब्द पाळला आहे.’ असे पत्र राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी लिहिले आहे.

‘अहमदनगर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शशिकांत गाडे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली. यापुढचे निर्णय उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकत्र बसून घेतील. त्याला आमच्या आणि सेनेच्या कार्यकर्त्यांची मान्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला आणि त्यांचा निरोप मिलिंद नार्वेकर यांचं अजित पवारांशी बोलणं झाल्याप्रमाणे आम्हाला मिळाला’ असेही संग्राम जगताप यांनी लिहिले आहे.

अहमदनगर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष अंतर्गत वाद मिटवून एकत्र आले. अहमदनगर पालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली. शिवसेनेच्या योगीराज गाडे यांचा उमेदवारी अर्ज पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मागे घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याची भूमिका बजावली. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यातही याबाबत चर्चा घडवून नगर मधील अंतर्गत वादाला पूर्णविराम दिला.

काय आहे प्रकरण?

स्थायी समिती सभापतींच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेत राजकीय घडामोडींना वेग आला. स्थायी समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली असतानाच भाजपचे दावेदार मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. (NCP MLA Sangram Jagtap thanks CM Uddhav Thackeray for Supporting in Ahmednagar Standing Committees Chairman Election)

भाजपवासी असतानाही मनोज कोतकर हे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मनोज कोतकर यांच्या प्रवेशाने राजकीय भूकंप आल्याची चर्चा नगरच्या राजकारणात रंगली. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर कोतकरांनी काल सभापतीपदासाठी उमेदवारी अर्जही दाखल केला, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये राजकीय भूकंप, सभापतीपदाच्या रिंगणातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत

(NCP MLA Sangram Jagtap thanks CM Uddhav Thackeray for Supporting in Ahmednagar Standing Committees Chairman Election)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.