“आबांनंतर आदर्श गृहमंत्री, भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळे अनिल देशमुखांचा राजीनामा”

भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला, असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे. (Amol Mitkari Anil Deshmukh RR Patil)

आबांनंतर आदर्श गृहमंत्री, भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळे अनिल देशमुखांचा राजीनामा
आर आर पाटील, अनिल देशमुख
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 3:54 PM

Maharashtra Home Minister Resign : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर काही तासातच देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. “आबांनंतर आदर्श गृहमंत्री म्हणून पाहिलं गेलेल्या अनिल देशमुखांना भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळे राजीनामा द्यावा लागला” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिली आहे. (NCP MLC Amol Mitkari compares former Home Minister Anil Deshmukh with RR Patil Aaba)

काय म्हणाले अमोल मिटकरी?

“गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इतके वर्ष राजकीय कारकीर्द सांभाळली, ज्यात त्यांच्यावर कधीच भ्रष्टाचारचे आरोप झाले नव्हते. मंत्रिमंडळात एक आदर्श गृहमंत्री म्हणून आबांनंतर त्यांच्याकडे पाहिले गेले. भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळे आज त्यांना राजीनामा द्यावा लागला. वेदनादायी” असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

आर आर आबा यांचं गृहमंत्रिपद

25 डिसेंबर 2003 रोजी आर आर पाटील यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्रिपद स्वीकारलं होतं. 1 नोव्हेंबर 2004 रोजी त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली. आर आर आबा यांच्याकडे स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून पाहिलं जाई. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या गृहमंत्रिपदावर वीज कोसळली होती.

मुंबईवरील हल्ला हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश आहे का, असा सवाल पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता, त्याला उत्तर देताना आबा ‘बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते रहते है’ असं म्हणून गेले. मुंबईवरील हल्ल्याबाबत झालेलं वक्तव्य आबांना भोवलं. 1 डिसेंबर 2008 त्यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं.

अनिल देशमुख यांचा राजीनामा

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये सत्यता नाही. मात्र उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर त्याचा सन्मान ठेवण्याची सरकारची जबाबदारी आहे. सीबीआय चौकशीदरम्यान पदावर राहणे योग्य नाही, अशी भूमिका अनिल देशमुख यांनी पक्षासमोर मांडली. (Amol Mitkari Anil Deshmukh RR Patil)

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचं पत्र जसंच्या तसं

5 एप्रिल 2021

प्रति

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आदरणीय महोदय

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे.

सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे,

ही नम्र विनंती

आपला

अनिल देशमुख

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh Resignation : अनिल देशमुखांचा राजीनामा, गृहमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार?

अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र जसंच्या तसं

(NCP MLC Amol Mitkari compares former Home Minister Anil Deshmukh with RR Patil Aaba)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.