चंद्रकांतदादांचे 200+चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना, राष्ट्रवादीने भाजप प्रदेशाध्यक्षांना डिवचलं

आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे (Amol Mitkari Chandrakant Patil West Bengal)

चंद्रकांतदादांचे 200+चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना, राष्ट्रवादीने भाजप प्रदेशाध्यक्षांना डिवचलं
chandrakant patil
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 2:03 PM

मुंबई : “चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200+ चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या” असं म्हणत राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari ) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना डिवचले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत (West Bengal Election Results 2021) भाजप 100 च्या आसपास जागा मिळवण्याची शक्यता आहे, तर तृणमूल काँग्रेसने 185 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. (NCP MLC Amol Mitkari taunts BJP State President Chandrakant Patil over West Bengal Election Results 2021)

अमोल मिटकरींचे ट्वीट काय?

“चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200+ चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या. भाजपचे अनेक महादिग्गज प. बंगालमध्ये आले, मिथुनदापण आले, सगळे व्यर्थ गेले. 4 वरुन 84 वर जागा आल्या, हे बोलायला राज्यातील भाजप नेत्यांना जागा शिल्लक ठेवली आहे. स्वप्न मात्र भंगले.” असे तिरकस बाण मिटकरींनी ट्विटरवरुन सोडले.

पश्चिम बंगालची स्थिती काय

आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तूर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल. (NCP MLC Amol Mitkari taunts BJP State President Chandrakant Patil over West Bengal Election Results 2021)

शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचे अभिनंदन

“या विस्मयचकित करणाऱ्या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांच्या कल्याणासाठी एकत्रपणे काम करणे सुरु ठेवुयात. तसेच कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करुयात” असे ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करणाऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

रोहित पवारांचा इंधनदरावरुन निशाणा

दरम्यान, चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळे आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

संबंधित बातम्या :

पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींपुढे मोदी-शाहांचा करिष्मा फेल, तृणमूल काँग्रेसला 203 जागांवर आघाडी

पश्चिम बंगालच्या निकालानंतर शरद पवारांकडून ट्विट करुन महत्त्वपूर्ण संकेत

(NCP MLC Amol Mitkari taunts BJP State President Chandrakant Patil over West Bengal Election Results 2021)

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.