“जनतेला फसवणाऱ्या भाजपचा आलाय विट”, ऐन दिवाळीच्या दिवशी राष्ट्रवादीचं आंदोलन
ऐन दिवाळीच्या दिवशी राष्ट्रवादीने शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलन छेडलं आहे. पाहा...
पुणे : ऐन दिवाळीच्या दिवशी राष्ट्रवादीने शिंदे सरकारच्या विरोधात (Eknath Shinde) आंदोलन छेडलं आहे. दिवाळीनिमित्त देण्यात येणाऱ्या स्वस्त धान्य किटवरून राष्ट्रवादीने सरकारला घेरलं आहे. दिवाळीनिमित्त (Diwali) स्वस्त धान्य किट ही फसवी योजना असा आरोप करत राष्ट्रवादीने (NCP) पुण्यात राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं.
पुण्यात राष्ट्रवादीने राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं. दिवाळीनिमित्त राज्य सरकार गोरगरिबांना वाटणार होतं त्या अनेकापर्यंत पोहोचल्याच नाहीत, असा आरोप करत पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. पुण्यातील दांडेकर पुलावर राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं आहे.
तुम्हाला मोदींच्या मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटो त्या किटवर छापायचा होता. त्याला उशीर झाला म्हणून तुम्ही किट वेळेवर दिले नाहीत, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्यावतीने लागवण्यात आलाय.
राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
पुण्यातील शिधा किटचं वास्तव
शिधा किट वाटपाचे सरकारचे नियोजन फसलं आहे. पुणे जिल्ह्यात वाटण्यात येणाऱ्या शिधा कीटचे नियोजन फसलं. पुणे जिल्ह्यात निम्म्या लाभार्थ्यापर्यंत शिधा किट पोहोचलंच नाही. काल सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील फक्त 50% रेशन दुकानावरच किट पोहोचलं आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण एकूण 1823 रेशन दुकाने असून त्यातील केवळ 921 दुकानातच कीट पोहोचले आहेत. त्यामुळे सरकारने घोषणा केली खरी, पण ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे.