मोदी लाटेतही उदयनराजे भोसलेंचा पराभव करण्याचा पराक्रम; जाणून घ्या श्रीनिवास पाटलांची राजकीय कारकीर्द

श्रीनिवास पाटील हे नाव साताऱ्यातील 2019 च्या पोटनिवडणुकीनंतर जणू दंतकथाच झाले आहे. | Shrinivas Patil NCP

मोदी लाटेतही उदयनराजे भोसलेंचा पराभव करण्याचा पराक्रम; जाणून घ्या श्रीनिवास पाटलांची राजकीय कारकीर्द
श्रीनिवास पाटील, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 3:49 PM

मुंबई: 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचा पडता काळ सुरु होता. एक-एक नेता शरद पवार यांची साथ सोडून जात होता. अशातच सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन राष्ट्रवादीविरोधात दंड थोपटले होते. 2014 मध्ये देशात सर्वाधिक मतांनी निवडून येणाऱ्यांपैकी एक असलेल्या उदयनराजे भोसलेंविरोधात उभं राहण्यासाठी कोणीही धजावत नव्हतं. मात्र शरद पवारांनी शब्द टाकला आणि श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil ) एका पायावर तयार झाले. त्यानंतर जे काही घडलं तो इतिहास महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. (NCP satara lok sabha constituency MP Shrinivas Patil Political journey)

कोण आहेत श्रीनिवास पाटील?

11 फेब्रुवारी 1941 साली पाटण तालुक्यातील मारुल हवेली या गावात एका शेतकरी कुटुंबात श्रीनिवास पाटील यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या थोरामोठ्यांचा सहवास लाभला. शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर त्यांना यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ यांचे मार्गदर्शन लाभले. या सगळ्या शिदोरीच्या जोरावर श्रीनिवास पाटील हे जिल्हाधिकारी झाले.

शरद पवार यांच्याइतकेच पावसाळे पाहिलेला आणि कायम त्यांच्या बाजूला भक्कमपणे उभे असणारे श्रीनिवास पाटील हे नाव साताऱ्यातील 2019 च्या पोटनिवडणुकीनंतर जणू दंतकथाच झाले आहे. सुरुवातीला सनदी अधिकारी असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांना शरद पवार यांनी राजकारणात आणले.

साधी राहणी, रांगड्या बोलीतील भाषणे, गावोगावच्या जत्रा आणि कुस्तीची मैदाने आणि पंगतीला बसून कार्यकर्त्यांच्या पत्रावळीमध्ये जेवण करण्यामुळे ते लोकांना आपल्या घरातील व्यक्ती असल्यासारखे वाटत. 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 या काळात पाटील यांनी खासदारपद भूषविले होते. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. 1 जुलै 2013 ते 26 ऑगस्ट 2018 या कालावधीत ते सिक्कीमचे राज्यपाल होते.

खासदार श्रीनिवास पाटील उतरले शेतात; नातवंडांसोबत लुटला भातकापणीचा आनंद

शरद पवारांइतके पावसाळे पाहिलेला माणूस

राजकीय प्रचारात शरद पवारांच्या वयाचा उल्लेख वारंवार झाला. ज्या ताकदीने, ज्या जिद्दीने पवार लढले, त्याच ताकदीने, त्याच जिद्दीने श्रीनिवास पाटीलही त्यांच्यासोबत उभे राहिले. श्रीनिवास पाटील यांचंही वय शरद पवारांएवढंच म्हणजेच, 78 वर्ष इतकंच आहे. शरद पवारांची जन्म तारीख 12 डिसेंबर 1940, तर श्रीनिवास पाटील यांची जन्म तारीख 14 फेब्रुवारी 1941. म्हणजेच श्रीनिवास पाटील हे शरद पवारांपेक्षा केवळ 2 महिन्यांनी लहान आहेत.

साधारणत: 80 च्या घरात पोहोचलेली माणसं थकलेली, आराम करणारी, काठीचा आधार घेऊन चालताना आपण पाहिली आहेत. मात्र शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्यासारखे योद्धे पाहिले तर ते 80 च्या घरातील आहेत, हे कोणालाही वाटणार नाही.

साताऱ्याच्या पावसातील ती अविस्मरणीय सभा

78 वर्षीय शरद पवारांची साताऱ्यातील सभा केवळ महाराष्ट्रानेच नाही तर देशाने पाहिली. उभ्या पावसात शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना झालेली चूक सातारकरांसमोर मान्य केली. ती चूक सुधारण्याची संधी मागितील. पाऊस कोसळत होता, 78 वर्षीय पवार भिजत होते. त्यावेळी पवारांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांचा मित्र-श्रीनिवास पाटीलही उभे होते. पवारांनी भाषण करुन उभ्या पावसात ‘आग’ लावली.

पवारांच्या भाषणानंतर श्रीनिवास पाटलांनी घोषणा दिली, ‘मान छत्रपतीच्या गादीला, तुमचं मत राष्ट्रवादीला.. श्रीनिवास पाटलांची ही घोषणा सातारकरांनी सत्यात उतरवली. 5 महिन्यांपूर्वी उदयनराजेंना दीड लाखांच्या मताधिक्याने विजयी करणाऱ्या सातारकरांनी, पोटनिवडणुकीत जवळपास लाखभर मतांनी पराभूत केलं.

NCP MP Shrinivas Patil Political journey who is Shrinivas Patil

पहिल्यात फटक्यात कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना चारली पराभवाची धूळ

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर लोकसभा निवडणुकीत कराड मतदारसंघातून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत कठीण आव्हान होते.

त्यावेळी कराड म्हणजे चव्हाण कुटुंबीयांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील आनंदराव चव्हाण, आई प्रेमिला चव्हाण हे दोघेही कराड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात तुलनेने नवख्या असलेल्या श्रीनिवास पाटील यांचा निभाव कसा लागेल, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, दांडगा जनसंपर्क, लोकांमध्ये सहजपणे मिसळण्याचा स्वभाव आणि रांगड्या भाषणशैलीच्या जोरावर श्रीनिवास पाटील यांनी पहिल्याच फटक्यात पृथ्वीराज चव्हाण यांना अस्मान दाखवले.

(NCP satara lok sabha constituency MP Shrinivas Patil Political journey)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.