सुनील तटकरे भेटीसाठी चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर!

राष्ट्रवादीचे बडे नेते आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे भेटीसाठी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या बंगल्यावर दिसले.

सुनील तटकरे भेटीसाठी चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर!
Follow us
| Updated on: Jul 31, 2019 | 9:33 AM

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडलं असताना, पक्षाची चिंता वाढवणारं दृश्य मंगळवारी रात्री पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे बडे नेते आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे भेटीसाठी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या बंगल्यावर दिसले. काल रात्री आठच्या सुमारास सुनील तटकरे हे थेट चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर दिसल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत तटकरे भाजप मंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचल्यानं अनेकांच्या भुवय्या उंचावल्या. पण चंद्रकांतदादांची भेट न घेताच तटकरे माघारी परतले. मतदारसंघातल्या कामासाठी गेल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलं. मात्र सध्या राष्ट्रवादीतून होणारी आऊटगोईंग पाहता, राष्ट्रवादीचा बडा नेता थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी दिसल्याने चर्चा होणं साहजिकच आहे.

तटकरे नेमके मतदारसंघातल्या कोणत्या कामासाठी गेले होते याबाबतची स्पष्टता झाली नाही.  सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची चंद्रकांत पाटलांची भेट झाली नाही. बंगल्याजवळ राष्ट्रवादीसह अन्य पक्षातील नेते त्याठिकाणी होते. त्यामुळे सुनील तटकरे हे भेट न घेताच मंत्रालयाच्या दारावरुनच माघारी परतले.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांचे राजीनामे

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी काल एका दिवसात राजीनामे दिले. यामध्ये साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad), मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) आणि नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) यांचा समावेश आहे. हे चौघेही आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

संबंधित बातम्या 

काँग्रेस–राष्ट्रवादीच्या चार आमदारांचे राजीनामे 

कोण कितीही पावरफुल असो, सत्ता नसली की लोक विसरतात : शिवेंद्रराजे भोसले  

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.