मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध भावंडे. दरवर्षीप्रमाणे या भावंडांनी रक्षाबंधनाचा सण घरच्या घरी उत्साहात साजरा केला. (NCP MP Supriya Sule Deputy Chief Minister Ajit Pawar Rakshabandhan Celebration in Mumbai)
सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते.
VIDEO : खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रक्षाबंधन#RakshaBandhan #RakshaBandhan2020 #rakhispecial @supriya_sule @AjitPawarSpeaks @PawarSpeaks pic.twitter.com/dK8he4Jd0d
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 3, 2020
सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवर रक्षाबंधनाचे लाईव्ह शेअर केले आहे. सुप्रिया सुळे यांचे लाडक्या दादावरील प्रेम सर्वश्रुत आहे. पवार कुटुंबीय दरवर्षी एकत्र जमून मोठ्या प्रमाणावर रक्षाबंधन, भाऊबीज यासारखे सण-उत्सव साजरे करतात. यंदा मात्र कोरोनामुळे त्याला कात्री लावावी लागली. अजित पवार यांच्या वाढदिवशी सर्व बहिणींनी त्यांचे ऑनलाईन औक्षण केले होते.
भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची आठवण करुन देणारा आजचा सण अर्थात रक्षाबंधन. या सणाच्या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा. pic.twitter.com/k4PmvTE4Qr
— Supriya Sule (@supriya_sule) August 3, 2020
“कोरोना काळात अनेक महिला डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशा ताई, महिला पोलीस असा मोठा भगिनीवर्ग जीवाची जोखीम पत्करुन समाजातील इतर भावांच्या रक्षणासाठी लढत आहे. त्यांच्या शौर्य, त्याग, समर्पणाबद्दल आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे” अशा भावना अजित पवार यांनी सकाळीच ट्विटरवरुन व्यक्त केल्या होत्या.
महाराष्ट्राच्या जनतेला ‘रक्षाबंधन’ सणाच्या हार्दिक शुभेच्छा! भाऊ-बहिणीचं पवित्र नातं साजरं करीत असताना समाजातील स्त्री-पुरुष समानतेची भावना या सणामुळे अधिक दृढ होईल, असा मला विश्वास आहे. pic.twitter.com/x6crt193KA
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 3, 2020
हेही वाचा : VIDEO : ‘आता अजित पवारांबाबत महत्त्वाची बातमी!’ स्टुडिओमध्ये सुप्रिया सुळे न्यूज अँकरच्या भूमिकेत
(NCP MP Supriya Sule Deputy Chief Minister Ajit Pawar Rakshabandhan Celebration in Mumbai)